आंबोली घाटात झाड कोसळल्यामुळे दीड तास वाहतूक ठप्प
11:49 AM Jun 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
Advertisement
सावंतवाडी - आंबोली घाटमार्गावरील देवसू पलीकडचीवाडी येथे जाणाऱ्या कुंभेश्वर रस्त्या नजीक एक झाड कोसळल्यामुळे सुमारे दिड तास वाहतूक ठप्प झाली . त्यामुळे सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने तसेच आंबोली घाटातून सावंतवाडीकडे जाणारी वाहने रस्त्यावरच अडकून पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या . अखेर ग्रामस्थांनी जेसीबी बोलावून झाड बाजूला हटविल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली . पावसाळा सुरु झाला की रस्त्याच्या बाजूची धोकादायक झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण होत असते . त्यामुळे संबंधित विभागाने घाटरस्त्यातील अशी धोकादायक झाडे , फांद्या तोडाव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत .
Advertisement
Advertisement