For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवती - पाटकरवाडीत वड कोसळल्याने वाहतूक खोळंबली

03:09 PM Jun 07, 2026 IST | अनुजा कुडतरकर
निवती   पाटकरवाडीत वड कोसळल्याने वाहतूक खोळंबली
Advertisement

प्रतिनिधी/निवती

Advertisement

निवती - पाटकरवाडी येथे रविवारी पहाटे वडाचे जुने मोठे झाड रस्त्यावर पडून रस्ता बंद झाल्याने निवतीवरून म्हापणच्या दिशेने होणारी वाहतुक सुमारे पाच तास बंद होती. त्यामुळे निवती येथून सकाळी 7 वाजता सुटणारी एस.टी.बस अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल झाले.तसेच निवती येथून 9 वाजता कुडाळ व म्हापण मच्छिमार्केटला जाणारे टेम्पो अडकून पडले.घटना समजताच मेढा उपसरपंच प्रज्योत मेतर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने वडाचे झाड तोडून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.झाड रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी गजा मांजरेकर, शशी पाटकर, किशोर पाटकर, दाजी नागोळकर, भुपेश मेस्त, संतोष भगत आदी गामस्थांचे सहकार्य लाभले.या कालावधीत मेढा गामपंचायत हद्दीतील लाईट बंद करून ती पुन्हा सुरु करण्यात आली. याकामी महावितरणचे वायरमन श्री. नांदोस्कर यांनी मोलाचे सहकार्य केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.