महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वाहन चालकांच्या बेशिस्त पार्किंगमुळे कॉलेज रोडवर वाहतूक कोंडी

10:15 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा

Advertisement

बेळगाव : कॉलेज रोड येथे बेशिस्त पद्धतीने केल्या जाणाऱ्या पार्किंगमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. नो पार्किंग झोनमध्येही रस्त्यावर एकामागे एक वाहने लावली जात असल्याने वाहने ये-जा करण्यास जागा अपुरी पडत आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कॉर्नरवरच बेशिस्त पार्किंग होत असल्याने ही गोष्ट पोलिसांच्या नजरेस येत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील बेशिस्त पार्किंगची समस्या काहीकेल्या कमी होताना दिसत नाही. रहदारी पोलिसांकडून नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावल्यावर भारी दंड आकारला जात आहे. तरीदेखील बेशिस्त पार्किंग करण्याचे प्रकार सुरूच आहेत. कॉलेज रोड येथे अनेक हॉस्पिटल, कार्यालये, शोरुम्स असल्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी होते. बरेच वाहनचालक पदपथावरही वाहनांचे पार्किंग करतात. तर काही जण थेट रस्त्यावरच नो पार्किंग झोन असतानाही पार्किंग करत आहेत. चन्नम्मा चौकातून वेगाने येणारी वाहने कॉलेज रोडवर येऊन अडकत आहेत. जागा कमी असल्याने वाहने पुढे रेटणे कठीण होत आहे. मध्यंतरी रहदारी पोलिसांनी या ठिकाणी दोरी बांधून वाहने लावण्यास मज्जाव केला होता. परंतु, पुन्हा बेशिस्त पार्किंग केले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article