For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅम्प परिसरात वाहतुकीची कोंडी

11:25 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅम्प परिसरात वाहतुकीची कोंडी
Advertisement

जलवाहिनीचे काम लवकर संपविण्याची वाहनचालकांतून मागणी

Advertisement

बेळगाव : कॅम्प येथे एलअॅण्डटी कंपनीकडून भूमिगत जलवाहिन्या घातल्या जात आहेत. ग्लोब टॉकीज कॉर्नर येथे मागील आठ दिवसांपासून जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू असल्याने या परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ग्लोब थिएटरमार्गे इंडिपेंडेंट रोडवरून जाणारी वाहने या कोंडीमध्ये अडकून पडली जात आहेत. त्यामुळे जलवाहिन्या घालण्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनचालकांतून केली जात आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात दोन महिन्यांपासून जलवाहिन्या घातल्या जात आहेत. रामघाट रोड, धोबीघाट रोड, हाय स्ट्रीट परिसरात एलअॅण्डटीकडून जलवाहिन्या घातल्या आहेत. यापूर्वीच्या सीईओंनी कॅन्टोन्मेंट बोर्डमधून भूमिगत जलवाहिन्या घालण्यास परवानगी दिली नसल्याने या कामाला विलंब झाला होता. परंतु, नव्या सीईओंनी परवानगी देताच काम सुरू करण्यात आले आहे. ग्लोब थिएटर कॉर्नर येथे आठ दिवसांपासून रस्त्याची खोदाई करण्यात आली. खोदाईसाठी जेसीबी व अन्य वाहने रस्त्याशेजारी लावत आहेत. गोगटे सर्कलमार्गे फिश मार्केटकडे जाणारी वाहतूकही यामुळे खोळंबत आहे. इंडिपेंडेंट रोडवरही वाहतूक कोंडी होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.