Kolhapur | रिमझिम पावसातही कोल्हापुरात रंगला पंजे भेटीचा भक्तिमय सोहळा
कोल्हापूर: हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिकअसलेल्या मोहरम पर्वानिमित्त शहरात मंगळवारी पारंपरिक पंजे भेटीचा सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असतानाही भाविकांचा उत्साह कायम राहिल्याचे चित्र शहरातील विविध भागांत पहायला मिळाले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पंजा भेटीचा सोहळा रंगल्याने शहरातील विविध दर्त्यांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील घुडणपीर दर्गा परिसरात प्रमुख पंजे भेटीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बाबू जमाल तालीम मंडळ, नंगीवली तालीम मंडळ, शिवाजी पेठ, फुलेवाडी, बुधबार पेठ, आझाद चौक, आझाद गल्ली, गुजरी कॉर्नर तसेच उपनगरांतील विविध पंजे पारंपरिक मिरवणुकांसह भेटीसाठीउद्या खत्तल रात्र, शुक्रवारी विसर्जनवरम्यान, गुरुवार वि. २५ रोजी मोहरमच्या आठव्या रात्री 'खत्तल रात्र' हा धार्मिक विधी पार पडणार असून त्यासाठी विविध पंजा मंडळांकडून तयारी करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवार, २६ रोजी पंजांचे विसर्जन होणार असून त्याद्वारे यंदाच्या मोहरम उत्सवाची सांगता होणार आहे. विसर्जन मिरवणुकीतही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका, पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
दाखल झाले होते. महाद्वार रोड, पापाची तिकटी, बिंदू चौक, मिरजकर तिकटी आदी मार्गावरून मिरवणुका मार्गस्थ होत होत्या. अबालवृद्धांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. अनेकांनी पारंपरिक पोशाख परिधान करून सहभाग घेतला. पंजे भेटीच्यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरव आतषबाजी केली जात होती. अनेक ठिकाणी स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.भेटीच्या सोहळ्यानंतर भाविकांनी दर्गा परिसरात दर्शन घेऊन प्रार्थना केली. हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या मोहरम उत्सवाची परंपरा व श्रद्धा यांचे दर्शन या सोहळ्यातून पहायला मिळाले.