For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्युचर्स आणि ऑप्शन्स व्यवहार वेळ मर्यादा वाढणार

06:13 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्युचर्स आणि ऑप्शन्स व्यवहार वेळ मर्यादा वाढणार
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) ने इक्विटी डेरिव्हेटीव्ह म्हणजेच फ्युचर्स आणि ऑप्शन्स व्यवहाराच्या वेळ मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 ऑगस्ट 2026 पासून फ्युचर्स आणि ऑप्शन्सच्या व्यवहाराची वेळ 10 मिनीटे वाढवली जाणार असून 3.30 वाजता बंद होणारे हे व्यवहार 3.40 वाजता बंद होणार आहेत. हा बदल 3 ऑगस्टपासून दिसणार आहे.

डेरिव्हेटीव्हस मार्केटचे कामकाज आणि कॅश सेगमेंटमध्ये सुरु केलेल्या नव्या क्लोजिंग ऑक्शन प्रणालीत साधर्म्य साधण्यासाठी असे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एनएसईने म्हटले की, याशिवाय इतर सेशन्सच्या वेळा, जसे की प्री-ओपन सेशन आणि ट्रेड मॉडिफिकेशन विंडो यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.