व्यापार कराराने शेअरबाजारात उसळी
06:03 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
गुंतवणूकदारांच्या खात्यात 12 लाख कोटींची भर
Advertisement
मुंबई
अमेरिकेने भारतासोबतचा व्यापार करार अंतिम करत 18 टक्के शुल्क आकारणीची घोषणा केल्याच्या कारणास्तव भारतीय शेअरबाजाराने मंगळवारी तुफान तेजी अनुभवली होती. सेन्सेक्स तब्बल विक्रमी 2072 अंकांनी वधारत 83373 वर तर निफ्टी 639 अंकांनी दमदार तेजीसोबत 25727 अंकांवर बंद झाले. निफ्टीने तर 9 महिन्यानंतर एका दिवसात सर्वाधिक तेजी नोंदवली. याचदरम्यान अमेरिका शुल्काचा परिणाम रुपयावरही सकारात्मक दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपयाही 1 रुपयांपेक्षा अधिक तेजीसह 90.27 वर बंद झाला होता. जागतिक स्तरावर आशियाई बाजारात तेजी होती. याचदरम्यान मंगळवारी गुंतवणूकदारांच्या खात्यात 12.5 लाख कोटी रुपयांची भर पडली होती.
Advertisement
Advertisement