For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टोयोटाची पहिली ई-एसयूव्ही अर्बन क्रूझर अबेला लाँच

06:06 AM Jan 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
टोयोटाची पहिली ई एसयूव्ही  अर्बन क्रूझर अबेला लाँच
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

जपानी कार उत्पादक टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार ‘अर्बन क्रूझर अबेला’ अनावरण केली आहे. ही एक मध्यम आकाराची इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे, जी मारुती सुझुकीच्या ‘इलेक्ट्रिक विटारा’ (ई विटारा)च्या प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे.

कंपनीचा दावा आहे की ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 543 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. भारतात, ती टाटा कर्व्ह ईव्ही, एमजी झेडएस ईव्ही आणि येणाऱ्या ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकशी थेट स्पर्धा करणार आहे. डिझाइनमध्ये मारुतीचा एक वेगळा आणि मस्क्युलर लूकअबेलाचा एकूण प्रोफाइल मोठ्या प्रमाणात मारुती ई-विटारासारखाच आहे, परंतु टोयोटाने तिच्या फ्रंट डिझाइनमध्ये बदल केले आहेत.

Advertisement

फिचर्स : 

कारमध्ये18 इंचाचे एरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्स आणि ब्लॅक बॉडी क्लॅडिंग . मागील बाजूस कनेक्टेड एलईडी टेललॅम्प आणि रूफ स्पॉयलर.  कारची लांबी 4,285 मिमी आहे आणि व्हीलबेस 2,700 मिमी आहे

टोयोटा अर्बन क्रूझर अबेला 8 वर्षांची बॅटरी वॉरंटीसह  543 किमीच्या रेंजसह दोन बॅटरी पॅकसह येते. टोयोटा अबेला दोन बॅटरी पॅक पर्यायांसह ऑफर केली जाते.

2026 च्या सुरुवातीला शोरूममध्ये ती दिसेल.

टोयोटा 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी

60 टक्के खात्रीशीर बायबॅक सारख्या ऑफर देणार

Advertisement
Tags :

.