टोयोटाने वाढवल्या फॉर्च्युनरच्या किंमती
नवी दिल्ली :
जपानमधील वाहन निर्माती कंपनी टोयोटाने फॉर्च्युनर या गाडीची किंमत वाढवण्यात आल्याची माहिती मिळते आहे. टोयोटा कंपनीच्या विविध गाड्या भारतीय बाजारात सादर केल्या गेल्या आहेत. एसयुव्ही गटात चांगली लोकप्रिय असणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनर या गाडीची मात्र कंपनीने किंमत वाढवली आहे. तेव्हा यापुढे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या गाडीसाठी जादा पैशाची तरतूद करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टोयोटाने फॉर्च्युनरची किंमत 68 हजार रुपयांनी वाढवली आहे. टोयोटा फॉर्च्युनरच्या विविध व्हेरीयंटच्या किमती कमी अधिक वाढवल्या आहेत. टोयोटाने फॉर्च्युनर के 4 एक्स 2 पेट्रोल ऑटोमेटीकची एक्स शोरुम किंमत 68 हजार रुपयांनी वाढवली आहे. 4 एस 2 डिझेल एमटी, 4 एक्स 2 डिझेल एटी, 4 एक्स 4 डिझेल एमटी, जीआर-एस, 4 एक्स 4 डिझेल एमटी लेजेंडर व 4 एक्स 4 एटी लेजेंडर यांच्या किमती 40 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. फॉर्च्युनर बेस व्हेरियंटची एक्स शोरुम किंमत आता वाढीनंतर 36.05 लाख रुपये असणार आहे. तर टॉय व्हेरियंटची किंमत 52.34 लाख रुपये असणार आहे.