For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ई-20 इंधनाविरोधात 25 रोजी टाऊनहॉल

07:51 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
ई 20 इंधनाविरोधात  25 रोजी टाऊनहॉल
Advertisement

अरविंद केजरीवाल यांच्याकडून घोषणा

Advertisement

पणजी प्रतिनिधी

गोव्यातील वाहनमालकांच्या मागणीनुसार, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात जबरदस्ती लादल्या जाणाऱ्या ई-20 इंधनाविरोधात  टाऊनहॉल आयोजित करण्याची घोषणा केली आहे. हा टाऊनहॉल 25 ऑगस्ट रोजी दुपारी  3 वाजता विवांता, मिरामार येथे आयोजित करण्यात येणार असून, ई-20 इंधनामुळे त्रस्त असलेल्या गोमंतकीयांना आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

Advertisement

ई-20इंधनाविरोधात दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय टाऊनहॉलनंतर गोव्यातील हा टाऊनहॉल आयोजित केला जात आहे. या राष्ट्रीय टाऊनहॉलला तब्बल 7  लाख भारतीयांनी ऑनलाईन सहभाग नोंदवून या अभियानात सहभाग दर्शवला होता. या टाऊनहॉलमध्ये देशभरातील वाहनमालकांनी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत सहभागी होत ई-20 इंधनामुळे आलेले आपले वाईट अनुभव आणि समस्या मांडल्या होत्या.

गोव्यात ई-20 इंधनामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत आम आदमी पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे. गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि इतर राज्यस्तरीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील पेट्रोल पंपांना भेटी देऊन कळंगुटपासून काणकोणपर्यंत गोमंतकीयांशी संवाद साधला.

Advertisement
Tags :

.