सांगलीतील पर्यटकांच्या स्विफ्ट कारचा माडखोलात अपघात
03:07 PM May 07, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी
Advertisement
सांगलीहून सावंतवाडीच्या दिशेने येणारी पर्यटकांची स्विफ्ट कार (एम. एच .४३ . एक्स ६९९५) पलटी होऊन माडखोल - सावली हॉटेलच्या वळणावर अपघात झाला . ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली . कारमध्ये एकूण ६ प्रवासी असून त्यांना किरकोळ दुखापत झाली असून जीवितहानी झाली नाही . मात्र या अपघातात स्विफ्ट कारचे नुकसान झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली . अपघातातनंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती .
Advertisement
Advertisement