कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे पर्यटक अडकले

06:19 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देहराडूनमध्ये सोंग नदीला पूर

Advertisement

वृत्तसंस्था/ देहराडून

Advertisement

उत्तराखंडच्या काही भागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे देहराडूनमध्ये सोंग नदीला पूर आला. या आपत्तीमुळे अनेक रस्ते बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली. यामुळे अनेक पर्यटकही वाटेत अडकले. बचाव पथकाने काही जणांना सुखरूप बाहेर काढले असले तरी अजूनही काही पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऋषिकेशजवळील रस्ता अडवल्यामुळे चारधाम यात्रेवरही परिणाम झाला. या ढगफुटीमुळे चारधामला जाणाऱ्या प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागला.

रविवारी मध्यरात्रीनंतर देहराडून आणि मसुरीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे मालदेवता येथील सोंग नदी अचानक भरून वाहू लागली. मसुरीतील केम्प्टी फॉल्सच्या पाण्याची पातळीही झपाट्याने वाढली. केम्प्टी फॉल्समधून आलेल्या चिखल-दगडांचा खच जवळच्या दुकानांमध्ये पडला होता. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील डोंगराळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. केवळ उत्तराखंडमध्येच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा कहर दिसून येत आहे. राजस्थानमध्येही पावसामुळे बरेच नुकसान झाले आहे. तसेच बिहारमध्येही पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या बातम्या येत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article