महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

निर्बंधित जंगलक्षेत्रात पर्यटकांचा वावर

10:42 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्यावरणाला धोका : वनखाते अलर्ट : विनापरवाना फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा : हौस जीवावर बेतण्याची शक्यता 

Advertisement

बेळगाव : भीमगड अभयारण्यात परवानगीविना प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, अशा परवानगीविना येणाऱ्या पर्यटकांच्या जीवाला धोका आहे. बारमाही पडणाऱ्या धबधब्यावर मौजमस्ती करण्यासाठी तरुणांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, हीच हौस जीवावर बेतण्याची शक्यता आहे. बेळगाव येथील काही तरुण विनापरवाना जंगलात उतरले होते. यांना वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी माघारी धाडले आहे. शिवाय विनापरवाना जंगलात उतरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा वनखात्याने दिला आहे. खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य 19 हजार हेक्टर क्षेत्रात पसरले आहे. यामध्ये जंगल आणि वन्यप्राण्यांची संख्याही मोठी आहे. दरम्यान, वन्यजीव कायद्यानुसार जैवविविधता आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मात्र, कायदा हातात घेऊन काही जण अतिउत्साहीपणे जंगलात उतरत आहेत. त्यामुळे पर्यावरणाबरोबर जैवविविधतेलाही धोका निर्माण होऊ लागला आहे. कर्नाटक वन कायद्यानुसार जंगलात उतरण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. मात्र, अधिकाऱ्यांची नजर चुकवून काही पर्यटक जंगलात शिरू लागले आहेत. दरम्यान, धबधब्याजवळ पार्ट्याही केल्या जात आहेत. त्यामुळे शिल्लक असलेले अन्न, प्लास्टिक पिशव्या परिसरात टाकण्याचे प्रकार घडू लागले आहेत. परिणामी पर्यावरणाला धोका निर्माण होऊ लागला आहे.

Advertisement

खानापूर तालुक्यात जंगल क्षेत्र अधिक आहे. यामध्ये जैवविविधता आढळून येते. निसर्गरम्य परिसर आणि दाट झाडीमुळे पर्यटक जंगल क्षेत्राला पसंती देतात. मात्र, जंगलात उतरण्यापूर्वी वनखात्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, काही तरुणांकडून विनापरवाना जंगलात उतरण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. विशेषत: जंगलक्षेत्रात वाघ, बिबट्या, अस्वल, तरस, गवे, हत्ती आदी वन्यप्राणी आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका आहे. सहा महिन्यांपूर्वी खानापूर जंगल परिसरात बेळगाव येथील तरुण उतरले होते. दरम्यान, वाट चुकल्याने ते रात्रभर भरकटले होते. त्यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्या तरुणांची सुटका केली होती. सुदैवाने त्यांना कोणतीच इजा पोहोचली नाही. मात्र, विनापरवाना जंगलक्षेत्रात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे वनखातेही अलर्ट झाले आहे. विनापरवाना जंगलात येणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. भीमगड अभयारण्यात विनापरवाना येऊन धबधब्याजवळ पार्टी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे वनखाते जागरुक झाले आहे. अशांवर कारवाई करण्याचा इशारा खात्याने दिला आहे. खानापूर तालुक्यातील निसर्गरम्य जंगल परिसर सर्वांनाच मोहीत करतो. जंगल क्षेत्रात बारमाही वाहणारे धबधबे आणि दाट झाडी सर्वांनाच आकर्षित करीत आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याने काही तरुण या जंगल परिसरात फिरताना दिसत आहेत. मात्र, जंगल परिसरात फिरणे धोकादायक आहे. काही तरुण घरी न सांगताच जंगलाकडे जात आहेत. यामुळे पालकांनीही संबंधितांना समज देण्याची गरज आहे.

वन्यप्राण्यांनाही त्रास

जंगल परिसरात वन्यप्राण्यांचा वावर आहे. मात्र, अशा ठिकाणी पर्यटक गेल्यास त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका पोहोचतो. वन्यप्राणी सैरभैर होऊन हल्ला करण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांनी विनापरवाना कोणत्याही जंगलात उतरू नये.

प्रवेशबंदी तरीही...

भीमगड अभयारण्यात पर्यटकांना प्रवेशबंदी आहे. मात्र, तरीही काही पर्यटक अभयारण्यात येत आहेत. त्यामुळे अशांवर कारवाई केली जाणार आहे. भीमगड अभयारण्यातील मार्गावर बॅरिकेड्स लावून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

- शंकर कल्लोळकर, डीसीएफ, खानापूर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article