तेलंगणातील पर्यटकांच्या कारचा दाणोलीत अपघात
11:01 AM Jul 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
ओटवणे । प्रतिनिधी
गोवा येथून आंबोली येथे जाणाऱ्या तेलंगणा येथील पर्यटकांच्या स्विफ्ट कारची दाणोली बाजारपेठेतील मारुती मंदिराच्या पायरीला धडक बसल्याने कार पलटी होऊन अपघात झाला . ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने रस्त्यालगत कोणी उभे नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातात स्विफ्ट कारचे नुकसान झाले असून किरकोळ जखमी झालेल्या पर्यटकांना सावंतवाडीत उपचारासाठी नेण्यात आले आहे .
Advertisement
Advertisement