For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची कार 100 फूट दरीत कोसळली; दोघे गंभीर जखमी

05:10 PM Dec 26, 2025 IST | NEETA POTDAR
satara news   महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची कार 100 फूट दरीत कोसळली  दोघे गंभीर जखमी
Advertisement

                                           आंबेनळी घाटात भीषण अपघात

Advertisement

महाबळेश्वर : महाबळेश्वर पर्यटनस्थळी अमरावती येथून किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी निघालेले पर्यटकांचे टाटा नेक्सन वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात दोघे गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी झाले असून जखमींमध्ये लहान मुलाचा समावेश आहे.चालक निखिल शशिकांत पांढरीकर (वय ४३), शशिकांत माधवराव पांढरीकर (वय ७५) यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सातारा येथील रुग्णालयात अधिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातात पल्लवी अभिजित काशीकर (वय ४४), यक्षीत अभिजित काशीकर (वय ९) आणि शरयू शशिकांत पाढंरीकर (वय ६५) किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.आंबेनळी घाटातील तीव्र वळणावर चालकांचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. या अपघाताची माहिती समजताच महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्यासह पोलीस आणि स्थानिक प्रतापगड रेस्क्यू टीमसह महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे १०० फूट खोल दरीमधून हे बचावकार्य करण्यात आले आहे.

Advertisement

दुपारी एकच्या सुमारास अपघात झाला. महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सातारा येथे अधिक उपचारांसाठी जखमींना दाखल केले आहे. या बचावकार्यात ट्रेकर्सचे सुनिलबाबा भाटिया, ऋषिकेश जाधव, आशिष बिरामणे, अमित कोळी, अनिकेत वागदरे, सुजित कोळी, संकेत सावंत, ओंकार शेलार, आदित्य बावळेकर, साई हवालदार, दीपक ओंबळे आदी सहभागी होते.

Advertisement
Tags :

.