वीज-पाण्याची सुविधा नसलेले पर्यटक गाव
मोबाइल चार्ज करण्यासाठी असते चढाओढ
आधुनिकतेचा झगमगाट आणि तंत्रज्ञानाच्या गोंगाटापासून कुठलेच ठिकाण दूर राहू शकते का असा प्रश्न मनात उपस्थित करून पहा. उरुग्वेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले एक छोटेसे गाव काबो पोलोनिया याच साधेपणा आणि संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. अटलांटिक महासागराच्या किनाल्यावर वाळूच्या एका चिंचोळ्या पट्टीवर वसलेल्या या गावात वीजवाहिनी नाही तसेच नळांमधून वाहणारे पाणीही नाही. तसेच येथे रस्ताही नाही. येथील शांतता इतकी गाढ आहे की येथे राहणारे लोक रात्री केवळ मेणबत्त्यांचा प्रकाश आणि चंद्राच्या प्रकाशाच्या भरवशावर जगत असतात. काबो पोलोनियो मुख्य महामार्गापासून जवळपास 7 किलोमीटर अंतरावर आहे, परंतु येथे पोहोचण्यासाठी कुठलाच पक्का रस्ता नाही.
पर्यटकांना तेथे पोहोचण्यासाठी वाळूच्या टेकड्यांवर पायी चालावे लागते किंवा मग विशेष वाहनांची मदत घ्यावी लागते. पूर्ण गावात केवळ एक भव्य दीपगृह अशी संरचना आहे, जी वीजेच्या ग्रिडशी जोडलेली आहे. उर्वरित पूर्ण गाव अंधारात बुडालेले असते. अशास्थितीत मोबाइल चार्ज करण्यासाठीही मोठी गर्दी असते. येथे राहणारे लोक पेयजलासाठी विहिरी किंवा पावसावर निर्भर आहेत. काही व्यवसायांनी सौरपॅनेल किंवा पवनचक्क्यांची व्यवस्था केली असली तरीही ती अत्यंत मर्यादित आहे. या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्या नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीव आहेत. येथे दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठी सी-लायन कॉलनी आहे. दीपगृहाच्या शिखरावरुन सी-लायन्सना दगडांवर आराम करताना सहजपणे पाहिले जाऊ शकते.
सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान येथे शांत पाण्यात व्हेलमाशांचे दर्शनही सामान्य आहे. येथे स्ट्रीटलाइट नसल्याने कोबो पोलोनियाचे आकाश उरुग्वेच्या सर्वात अंधारयुक्त आणि साफ आकाशांपैकी एक मानले जाते, जेथे रात्रीला चंद्र आण तारे स्वत:च्या पुर्ण चमकसह दिसून येतात. पर्यटकांसाठी हे ठिकाण एखाद्या नंदनवनापेक्षा कमी नाही, विशेषकरून अर्जेंटीना आणि ब्राझीलचे लोक शहरी गोंगाटापासून दूर शांततेच्या शोधात येथे येत असतात. परंतु येथील रहिवाशांसाठी आव्हाने कमी नाहीत. मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी लोकांना मुख्य दुकानावर निर्भर रहावे लागते, तेथे देखील तेव्हाच जेव्हा त्याचा जनरेटर चालू असेल. हिवाळ्यात येथे पर्यटकांची संख्या रोडावते, तर उन्हाळ्यात हे ठिकाण पर्यटकांनी ओसंडून गेलेले असते.