For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्यटन क्रूझ उलटून मध्य प्रदेशात दुर्घटना

02:36 AM May 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पर्यटन क्रूझ उलटून मध्य प्रदेशात दुर्घटना
Advertisement

नर्मदेच्या बर्गी धरणावर वादळामुळे अपघात : 6 मृतदेह सापडले : 15 हून अधिक बेपत्ता : 18 जणांना वाचवले

Advertisement

वृत्तसंस्था/ जबलपूर

मध्य प्रदेशातील बर्गी धरणावर गुरुवारी संध्याकाळी पर्यटन विभागाद्वारे चालवली जाणारी एक क्रूझ जोरदार वादळामुळे उलटल्याने मोठा अपघात झाला. सायंकाळपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर 15 ते 18 जण बेपत्ता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझमध्ये अंदाजे 35 ते 40 लोक होते. अपघातानंतर, बचाव पथकांनी 18 जणांना सुखरूप बाहेर काढले. पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य तीव्र करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हवामान अचानक बदलले असताना जोरदार वादळामुळे ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले. याचदरम्यान क्रूझवरील नियंत्रण सुटले आणि ती उलटल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले असून आपद्ग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.