For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवार, उडुपी, मंगळूर किनारपट्टी प्रदेशाचा विकासासाठी पर्यटन धोरणाचा विचार

10:31 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
कारवार  उडुपी  मंगळूर किनारपट्टी प्रदेशाचा विकासासाठी पर्यटन धोरणाचा विचार
Advertisement

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार : करावळी उत्सवाच्या सांगता समारंभाला उपस्थिती

Advertisement

कारवार : कारवार, उडुपी आणि मंगळूर जिल्ह्dयातील किनारपट्टी प्रदेशाचा विकास घडवून आणण्यासाठी नवीन पर्यटन धोरण निश्चित करण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. नवीन धोरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी जानेवारी 10 रोजी मंगळूर येथे किनारपट्टीवरील आणि मलनाड जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. ते येथील रविंद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावर आयोजित करण्यात आलेल्या करावळी उत्सवाच्या सांगता समारंभाला हजेरी लावण्यासाठी आले असता रविवारी रात्री पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नवीन पर्यटन धोरणासंदर्भात यापूर्वीच किनारपट्टीवरील आमदारांशी चर्चेची एक फेरी झाली आहे. मलनाड आणि किनारपट्टी प्रदेशाच्या पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी पीपीपी तत्वावर नवीन धोरण तयार करण्यात येईल.

खासगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी अधिक संधी देवून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार पुढे म्हणाले, मंगळूर येथील नियोजित बैठकीला गुंतवणूकादारांना हजर राहण्याचे आवाहन करण्यात येईल. शिवाय विदेशी गुंतवणूकदारांनाही आवाहन करण्यात येईल. बैठकीवेळी गुंतवणूकदार आपल्या मागण्यांसह सल्लेही देवू शकतात. भांडवल गुंतवणूकदारांना आवाहन करण्याची सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, विधानसभा अध्यक्ष हजर राहणार आहेत. बैठक आयोजित करण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. बैठकीस संबंधित खासदारांना, आमदारांना, स्थानिक संस्थांच्या सदस्यांना बोलविण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

Advertisement

कारवार विमानतळ निर्मितीला प्राधान्य

येथे रोजगार संधी उपलब्ध नसल्यामुळे येथील युवावर्ग मुंबई, गोवा, बेंगळूर, आखाती देशांकडे रोजगाराच्या शोधात निघून जात आहेत. येथील मानवीन संपन्मुलांचा वापर येथेच झाला पाहिजे. कारवार विमानतळ निर्मितीसाठी जमीन संपादन, विस्थापितांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात मंत्रीमंडळात हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. येथून जवळच्या नौदलाशी करार करून येथे विकास घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमदार सैल यांच्याकडून 210 कोटी रुपयांची मागणी

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, कारवारात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांनी योजना तयार केली असून यासाठी सैल यांनी सरकारकडे 210 कोटी रुपयांची मागणी केली आहे. या शिवाय सैल यांनी अनेक विकास कामांचा प्रस्ताव सरकारकडे पाठविले आहेत. येथील निर्जिवस्थेत असलेल्या सरकारी इमारती पाडून त्याठिकाणी नवीन इमारती बांधण्यात येतील, अशी माहिती पुढे शिवकुमार यांनी दिली. यावेळी जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, कारवारचे आमदार सतीश सैल, शिरसीचे आमदार भीमण्णा नाईक आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.