For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धुळीत गाडलेले पर्यटन: पाचगणी–महाबळेश्वर रस्ता सहा महिन्यांपासून रखडला, अर्थचक्र ठप्प!

05:56 PM Feb 25, 2026 IST | NEETA POTDAR
धुळीत गाडलेले पर्यटन  पाचगणी–महाबळेश्वर रस्ता सहा महिन्यांपासून रखडला  अर्थचक्र ठप्प
Advertisement

                     पाचगणी–महाबळेश्वर रस्ता सहा महिन्यांपासून रखडला;

Advertisement

पाचगणी  (इम्तियाज मुजावर) - पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पाचगणी–महाबळेश्वर रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून उखडून ठेवण्यात आल्याने या रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे.

उन्हाळी पर्यटन हंगाम अगदी तोंडावर असताना महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातील व्यवसायिक, हॉटेल व्यावसायिक आणि स्थानिक स्टॉलधारक यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

Advertisement

घनदाट हिरव्यागार वनराईवरही धुळीची जाड थर साचल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र समोर येत आहे. रखडलेल्या कामांमुळे पर्यटनाला मोठा फटका बसत असून प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :

.