कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हैदराबाद, पंजाबदरम्यान आज तगडा मुकाबला अपेक्षित

06:55 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मल्लानपूर

Advertisement

सातत्याच्या अभावाने ग्रासलेल्या पंजाब किंग्जचा आज मंगळवारी सनरायझर्स हैदराबादशी सामना होणार असून हैदराबादच्या अतिआक्रमक खेळाला तोंड देण्यासाठी पंजाबलाही आक्रमक पद्धतीने प्रदर्शन करावे लागेल. पंजाब आणि हैदराबाद या दोघांनीही त्यांच्या चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभव पत्करले असून चार गुणांसह अन्य दोन संघांसमवेत ते संयुक्तपणे गुणतालिकेतील स्थानावर विसावले आहेत. यातून बाहेर पडून वरच्या स्थानावर झेप घेण्यास दोन्ही संघ उत्सुक असतील.

Advertisement

 

सनरायझर्सविषयी भाकीत करणे कठीण असले, तरी त्यांनी आपली फलंदाजीतील ताकद दाखविलेली असून बहुतेक प्रसंगी त्यांच्या वरच्या फळीने धडाकेबाज कामगिरी करून दाखविली आहे. पण पंजाबच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. हैदराबादने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवताना आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली, तर शुक्रवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जवर सहा गडी राखून विजय मिळवला. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन आणि एडन मार्करम या खेळाडूंनी सातत्याने विरोधी गोलंदाजांवर आक्रमण करून संघाला धडाकेबाज सुऊवात करून दिली आहे.

पंजाबकडे शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन यांच्या रुपाने चांगले फटकेबाज असले, तरी कर्णधार धवन वगळता आतापर्यंत कोणीही सातत्यपूर्ण प्रदर्शन करू शकलेले नाही. पंजाबला प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा या भारतीय खेळाडूंकडून शशांक सिंगप्रमाणे कामगिरीची अपेक्षा असेल. शशांकने गुजरात टायटन्सविऊद्धच्या त्यांच्या मागील सामन्यात 29 चेंडूंत 61 धावा फटकावल्या.

 

दोन्ही संघांसाठी गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. शेवटच्या षटकांत पंजाबला संघर्ष करावा लागलेला आहे, तर सनरायझर्स नवीन चेंडूवर मारा करताना गडबडले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा सहा बळी घेऊन आघाडीवर असला, तरी डेथ-ओव्हर तज्ञ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांना सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखविता आलेली नसून ही चिंतेची बाब आहे. हरप्रीत ब्रारने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली, तरी लेगस्पिनर राहुल चहर महाग ठरला आहे.

हैदराबादतर्फे जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे व भुवनेश्वर कुमार यांनी खूप धावा दिल्या आहेत. अनुभव असूनही भुवनेश्वरला नवीन चेंडूवर प्रभाव पाडता आलेला नाही. दोन सामने गमावल्यानंतर पुनरागमन केलेल्या टी. नटराजनने आतापर्यंत चार बळी घेतले आहेत. चार सामन्यांत पाच बळी घेतलेला कर्णधार पॅट कमिन्स चांगला दिसत असला, तरी त्याला त्याच्या इतर गोलंदाजांची सातत्यपूर्ण साथ हवी आहे.

संघ : सनरायझर्स हैदराबाद-पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी. नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फाऊकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रे•ाr, मार्को जेनसेन, अभिषेक शर्मा, उपेंद्र यादव, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेन्रिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा, उमरान मलिक.

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम करन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वत कावेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media#sports
Next Article