राज्यात एकूण 4.55 कोटी पात्र मतदार
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : 99.32 लाख नावे डिलिट : यादीत नावे नसणाऱ्यांना ‘फॉर्म 6’ भरण्याची संधी
. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :
निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेनंतर राज्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या अंतिम मतदार यादीत आता एकूण 4.55 कोटी पात्र मतदारांचा समावेश आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान तब्बल 99.32 लाख मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
राज्यात एसआयआर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी म्हणजेच 16 जून 2026 पर्यंत, एकूण 5,54,32,314 मतदार होते. एसआयआर प्रक्रियेदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या मसुदा मतदार यादीत मतदारांची संख्या कमी होऊन 4.46 कोटींवर आली होती. आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अंतिम मतदार यादीत 4,55,00,011 मतदार आहेत. म्हणजेच, एसआयआरपूर्वीच्या संख्येच्या तुलनेत सुमारे 99,32,303 मतदार कमी झाले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने ही अंतिम मतदार यादी प्ttज्s://मद.क्arहूक्a.gदन्.ग्ह/ाह या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी अन्बुकुमार यांनी मंगळवारी अधिकृतपणे ही अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे.
राज्यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. अंतिम मतदार यादीनुसार, राज्यात 2,29,14,063 महिला मतदार आहेत, तर पुरुष मतदारांची संख्या 2,25,83,107 इतकी आणि तृतीयपंथी मतदारांची संख्या 2,841 इतकी आहे. यामध्ये 44,322 सेवा मतदार (लष्करी कर्मचाऱ्यांसह) आणि 3,252 अनिवासी भारतीय मतदारांचाही समावेश आहे. 18 ते 19 वयोगटातील तरुण मतदारांची संख्या 6,83,364 आहे. 85 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे 3,92,134 ज्येष्ठ मतदार आहेत. आकडेवारीनुसार, 5,65,340 दिव्यांग मतदार आहेत.
निवडणूक आयोगाने 30 जून रोजी राज्यात एसआयआर प्रक्रिया सुरू केली होती. यावरून देशभरात राजकीय वादही निर्माण झाले होते. चार महिने चाललेली ही मतदार यादी विशेष पुनरावलोकन प्रक्रिया आता पूर्ण झाली असून, आज अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यात यापूर्वी अशा प्रकारची एसआयआर प्रक्रिया 2002 मध्ये राबविण्यात आली होती. म्हणजेच, 23 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ही मोहीम पुन्हा हाती घेण्यात आली होती. बनावट मतदारांची ओळख पटवणे, मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींची नावे तसेच एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी असलेल्या व्यक्तींची नावे वगळणे आणि पात्र मतदारांच्या तपशीलांची पडताळणी करणे हा एसआयआर प्रक्रियेचा उद्देश होता.
20 जून ते 29 जून या कालावधीत एसआयआर प्रक्रियेची तयारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि अर्जांची छपाई पूर्ण करण्यात आली. चालू वर्षातील 30 जून ते 17 ऑगस्ट दरम्यान, ‘बूथ लेव्हल ऑफिसर’ (बीएलओ) यांनी घरोघरी जाऊन मतदारांना गणना अर्ज वाटप केले. मतदारांनी या अर्जांमध्ये आवश्यक माहिती भरून, त्यावर स्वाक्षरी करून ते पुन्हा संबंधित बीएलओंकडे सोपविले. या अर्जांमध्ये मतदारांच्या 2026 आणि 2002 मधील यादीच्या स्थितीबाबतच्या तपशीलांचा समावेश होता. त्यानंतर, 24 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली होता.
एसआयआरचे अर्ज भरणा करून सादर केलेल्या 4.46 कोटी मतदारांपैकी 43.84 लाख व्यक्तींना नोटीस बजावण्यात आली. 2002 च्या मतदार यादीतील तपशीलांशी विसंगती आढळलेल्या 20.35 लाख मतदारांचा आणि 2002 च्या यादीत कोणतेही रेकॉर्ड न सापडलेल्या 23.45 लाख मतदारांचा यात समावेश होता. या सर्वांना आवश्यक कागदपत्रे सादर करून आपले नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगण्यात आले. 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या काळात मतदारांना मसुदा मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली होती. नोटीस मिळाल्यानंतर उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. नोटीस बजावणे, उत्तरे स्वीकारणे, सुनावणी घेणे आणि अंतिम निर्णय घेणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी 22 ऑक्टोबरपर्यंत, म्हणजेच एकूण 58 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता.
दृष्टीक्षेप...
► महिला मतदार 2,29,14,063
► पुरुष मतदार 2,25,83,107
► तृतीयपंथी मतदार 2,841
► एकूण मतदार 4,55,00,011
जिल्हानिहाय मतदार
जिल्हे मतदार संख्या
बेळगाव 36,35,860
बेंगळूर शहर 24,01,939
म्हैसूर 22,80,067
तुमकूर 20,94,762
कलबुर्गी 18,94,144
विजापूर 17,08,099
मंगळूर 16,78,448
मंड्या 14,27,462
रायचूर 14,24,909
बागलकोट 14,13,341
हासन 13,93,908
धारवाड 13,78,016
शिमोगा 13,54,046
बेंगळूर उत्तर 13,25,284
दावणगेरे 13,20,819
चित्रदुर्ग 12,46,746
बिदर 12,46,746
हावेरी 12,33,294
कारवार 11,39,623
कोलार 11,39,393
बेंगळूर दक्षिण 11,13,554
बेंगळूर सेंट्रल 10,67,374
कोप्पळ 10,59,164
बळ्ळारी 10,20,264
उडुपी 10,14,143
विजयनगर 10,08,367
चिक्कबळ्ळापूर 9,53,372
यादगिरी 8,87,174
चिक्कमंगळूर 8,74,462
रामनगर 8,39,039
बेंगळूर ग्रामीण 8,04,534
चामराजनगर 8,00,858
गदग 7,94,567
कोडगू 4,11,632
मतदार यादीत नाव नसेल, तर काय करावे?
नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही, याची खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी भारतीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईटन्दे.ाम्ग्.gदन्.ग्ह ला भेट द्यावी लागेल. ‘व्होटर हेल्पलाईन’ हे मोबाइल अॅप्लिकेशन डाउनलोड करूनही मतदार यादीतील नाव तपासता येईल.
जर नाव अंतिम मतदार यादीत नसेल, तर निवडणूक आयोगाने ‘निरंतर नूतनीकरण’ (ण्दहूग्हल्दल्s ळज्datग्दह) प्रणाली लागू केली आहे. या अंतर्गत, पात्र मतदार आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ‘फॉर्म 6’ भरून ऑनलाईन अर्ज करता येईल.
ऑफलाईन पद्धतीसाठी, स्थानिक ‘बूथ लेव्हल ऑफिसर’ (बीएलओ) कडे किंवा तालुका कार्यालयात जाऊन ‘फॉर्म 6’ मिळवू शकता हा अर्ज करता येईल. 23 सप्टेंबरनंतर प्राप्त झालेले सुमारे 6.4 लाख अर्ज पुढील अद्ययावतीकरण प्रक्रियेदरम्यान हाताळले जातील.