महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राज्यात एकूण 5.47 कोटी मतदार

10:34 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना यांची माहिती

Advertisement

बेंगळूर : राज्यात लोकसभा निवडणूक दोन टप्प्यात होत असून 26 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 14 मतदारसंघ आणि 7 मे रोजी दुसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यात एकूण 5.47 कोटी मतदार असून त्यांच्यासाठी एकूण 58,834 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी 1832 विशेष मतदान केंद्रे स्थापण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना यांनी दिली. भारतीय निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीत एक विशेष घोषवाक्मय आणि लोगोची घोषणा करतो. तसेच या निवडणुकीसाठी ‘निवडणूक पर्व-देशाचे गर्व’ हे ब्रीदवाक्मय स्वीकारण्यात आले असून लोकशाहीत निवडणुका सर्वसमावेशक, सुरळीत, नैतिक, सहभागात्मकसह माहितीपूर्ण निवडणुका राज्यव्यापी लोकशाही उत्सवाप्रमाणे साजऱ्या केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. एन्न्Eिंझ् (सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन इलेक्टोरल पार्टिसिपेशन) अंतर्गत सर्व मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासह मतदानात प्रामुख्याने महिला मतदार, तऊण मतदार, आदिवासी मतदारांचा समावेश करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी एन्न्Eिंझ् जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे.

Advertisement

महिला मतदारांना मतदानात सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 05 सखी मतदान केंद्रांसह राज्यभरात एकूण 1120 मतदान केंद्रे महिलांद्वारेच व्यवस्थापित केली जाणार आहेत. या मतदान केंद्रांमध्ये सुरक्षा रक्षक, गट ड कर्मचारी आणि सर्व मतदान अधिकारी महिला असतील. दिव्यांग मतदारांमध्ये निवडणूक आणि मतदानाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभरात एकूण 224 मतदान केंद्रांवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 1 दिव्यांग केंद्रे स्थापण्यात येणार असून याठिकाणी दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतील, असे मनोजकुमार मीना यांनी सांगितले. युवा मतदारांमध्ये निवडणूक आणि मतदानाबाबत जागृती करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 1 प्रमाणे राज्यात एकूण 224 मतदान केंद्रांवर युवा अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. सर्व मतदारांमध्ये जागृतीसह निवडणुकीत सहभागी होण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 1 प्रमाणे राज्यात एकूण 224 मिशन अधारित मतदान केंद्रे स्थापली जाणार आहेत.   जंगलाच्या काठावर राहणाऱ्या आदिवासी मतदारांसाठी म्हैसूर, चामराजनगर, कोडगू, मंगळूर, उडुपी, चिक्कमंगळूर, हासन आणि शिमोगा जिल्ह्यांमध्ये एकूण 40 आदिवासी मतदान केंदे स्थापण्यात आली आहे. त्याठिकाणी पारंपारिक आदिवासी सांस्कृतिक पार्श्वभूमी दर्शविणारी सजावट केली जाणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article