For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात एकूण 5.37 कोटी मतदार

06:18 AM Jan 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यात एकूण 5 37 कोटी मतदार
Advertisement

अंतिम मतदारयादी जाहीर : महिला मतदारांच्या संख्येत मोठी वाढ

Advertisement

वार्ताहर/ बेंगळूर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात एकूण 5,37,85,815 मतदार आहेत. यामध्ये 2,69,33,750 पुरुष, 2,68,47,145 महिला तर 4,920 इतर मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रारुप मतदारयादीच्या तुलनेत अंतिम मतदार यादीत 4,08,653 मतदारांची भर पडली आहे.

Advertisement

राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या प्रारुप मतदार यादीत 5.33 कोटी मतदार होते. आता 4,08,653 मतदार वाढले आहेत. यामध्ये 2.77 लाख  महिला मतदारांची वाढ झाली आहे. 1.30 लाख पुऊष आणि 24 इतर मतदारांची भर पडली आहे, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघांपैकी बेंगळूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ 7,17,201 मतदारांसह सर्वात मोठा मतदारसंघ आहे. श्ऱुंगेरी मतदारसंघात सर्वात कमी 1,67,556 मतदार आहेत. 1 जानेवारी 2024 पर्यंत पात्र असलेल्यांनी अद्याप नोंदणी केली नसल्यास त्यांना त्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी निवडणूक सेवा पोर्टलद्वारे अर्ज सादर करता येतील. पात्र नवमतदार 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर 2024 या पात्रता तारखेनुसार त्यांचे अर्ज सादर करू शकतात.

मतदार ओळखपत्रांचे 100 टक्के वाटप करण्यात येणार असून छायाचित्र समाविष्ट करण्यात आले आहे. स्पीडपोस्टद्वारे मतदारांच्या पत्त्यावर ओळखपत्रे पाठविले जात आहेत. गेल्या नोव्हेंबरअखेर 17,47,518 ओळखपत्रे मतदारांना वाटप करण्यात आली आहेत. 10,76,506 ओळखपत्रे छापण्यात आली असून ती मतदारांपर्यंत पोहोचवली जातील, असे मनोजकुमार मीना यांनी स्पष्ट केले.

18 ते 19 वयोगटातील मतदार संख्येत वाढ

अंतिम मतदारयादीत सेवा मतदारांची संख्या घटली आहे. प्रारुप यादीतील सेवा मतदारसंख्या 47,172 वरून 46,501 वर आली आहे. 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या वाढली असून अंतिम यादीत 10,34,018 तऊण मतदार आहेत. तरुण मतदारांची संख्या 3,88,527 ने वाढली आहे. परदेशातील मतदारांची संख्या 3,164 असल्याचे त्यांनी सांगितले.

100 वर्षांवरील मतदारांची संख्या 17,937

80 वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांची संख्या 12,71,862 असून 100 वर्षांवरील मतदारांची संख्या 17,937 आहे. मतिमंद मतदारांची संख्या 5,62890 आहे. राज्यभरात 58,834 मतदान केंद्रे असून 845 मतदान केंद्रांचा नव्याने समावेश करण्यात आला असून 293 मतदान केंद्रे विलीन करण्यात आली आहेत. गेल्या 2019 च्या तुलनेत यावेळी 552 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे.

नियमानुसार मतदारयादीत नावे समाविष्ट करणे, वगळणे व फेरफार करणे यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करता येतो. अशाप्रकारे 35,02,328 मतदारांची भर पडली आहे. 11,14,257 नावे काढून टाकण्यात आली असून 13,43,123 मतदारांच्या तपशीलात दुरुस्ती करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादीत सर्वसाधारण मतदारांचे लिंग गुणोत्तर 991 वरून 997 वर पोहोचले आहे. युवा मतदारांचे लिंग गुणोत्तर 818 वरून 856 पर्यंत वाढले आहे, असेही मनोजकुमार मीना म्हणाले. पत्रकार परिषदेला अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी व्यंकटेश कुमार आणि कुमारराव उपस्थित होते.

महिला मतदारांच्या संख्येत मोठी वाढ

►  बेंगळूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 7,17,201 मतदार

► श्रुंगेरी मतदारसंघात सर्वात कमी 1,67,556 मतदार

► प्रारुप मतदारयादीच्या तुलनेत 4,08,653 मतदार वाढले

►  हजार पुरुष मतदारांमागे महिला मतदारांचे प्रमाण 997

► 80 वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांची संख्या 12,71,862

► राज्यात 58,834 मतदान केंद्रे, 845 नव्या मतदान केंद्रांचा समावेश

Advertisement
Tags :

.