For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपीस तीन वर्षांची सक्त मजुरी

12:40 PM Feb 27, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime    लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार  आरोपीस तीन वर्षांची सक्त मजुरी
Advertisement

          कोल्हापुरात महिलेवर अत्याचार प्रकरणी जिल्हा न्यायालयाचा निकाल

Advertisement

कोल्हापूर -लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विकास शंकरराव चव्हाण (वय ५०, रा. मराठा कॉलनी, कसबा बावडा) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ आर. व्ही आदने यांनी दोषी ठरवले. गुरुवारी त्याला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

सरकारी वकील म्हणून अॅड. मंजूषा पाटील यांनी काम पाहिले. २८ डिसेंबर २०१८ रोजी घडलेल्या या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली होती.

Advertisement

जिल्हा, सत्र न्यायालयाचा निकाल याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी विकास चव्हाण याचे मोबाईलचे दुकान आहे. या दुकानात २०१२ मध्ये पीडिता गेली होती. यावेळी विकास पीडितेची ओळख झाली. या दोघांच्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. विकास चव्हाण याने आपले लग्न झाले नसून, पीडितेसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. यानंतर वारंवार पीडित महिला राहत असलेल्या घरी, तसेच गोबा येथे महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवले होते.

Advertisement
Tags :

.