For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Baramati news | अत्याचार आणि बळजबरीने गर्भपात! अटकेत असलेल्या नराधम आरोपीचा पोलीस कोठडीत गळफास

03:21 PM Apr 29, 2026 IST | NEETA POTDAR
baramati news   अत्याचार आणि बळजबरीने गर्भपात  अटकेत असलेल्या नराधम आरोपीचा पोलीस कोठडीत गळफास
Advertisement

                बारामतीत पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या;

Advertisement

बारामती - नात्यातीलच ४८ वर्षीय व्यक्तीने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन गर्भपात केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीत गळफास घेऊन मंगळवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याने बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे. या आत्महत्ये मागच कारण माञ उघङ झाले नाही.

या प्रकरणाची सविस्तर हकिकत अशी की बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रवींद्र आनंदराव गार्डी (वय ४८) याने आपल्या नात्यातील १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर नात्याचा गैरफायदा घेत वारंवार लैंगिक अत्याचार केला. संबंधित मुलीला धमकावून तो वारंवार तो गैरकृत्यकरीत होता.

Advertisement

या अत्याचारातून मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकरण उघड होण्याच्या भीतीने आरोपीने फलटण येथील एका खासगी रुग्णालयात तिचा बळजबरीने गर्भपात केल्याचेही समोर आले आहे. या संपूर्ण प्रकारात पीडितेला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. गर्भपाताच्या घटनेनंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून बेदम चोप देवून त्याला पोलिसांच्या स्वाधीन
केले होते. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

दरम्यान मंगळवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास रवींद्र गार्डी हा पोलीस कोठडीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीने आत्महत्या कशामुळे केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.दरम्यान या प्रकरणी आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याच्या आत्महत्या मागे नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.