For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धामणे, मासगौंडहट्टी, हलगा, बस्तवाड भागात मुसळधार पाऊस

11:22 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
धामणे  मासगौंडहट्टी  हलगा  बस्तवाड भागात मुसळधार पाऊस
Advertisement

वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी-नागरिकांची धावपळ

Advertisement

वार्ताहर/धामणे

मंगळवार दि. 5 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास धामणे, मासगौंडहट्टी, हलगा, बस्तवाड या भागात अचानक ढगाळ वातावरण तयार होवून वादळी सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसेच विजेच्या कडकडाटाला सुरुवात झाल्याने या भागातील शेतकरी व नागरिकांची धावपळ उडाली. अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात होवून मुसळधार पाऊस पडल्याने या भागातील शिवारात पाणी साचले. याचबरोबर जोराच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी लहान मोठी झाडे पडली आहेत. धामणे भागात विद्युत तारेवरती झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी, अवचारहट्टी या भागातील रात्री 10 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद होता. त्यामुळे या भागात अंधाराच होता. परंतु हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी अंधाराचा विचार न करता विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्याचे काम तातडीने सुरू करून विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत चालु केला. देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी या भागातील मंगळवारी जोरदार सोसाट्याचा वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची बरीच धावपळ उडाल्याचे या भागातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु या भागात पाऊस पडला नसून फक्त वादळी वाऱ्याचा जोर होता, असे सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.