‘टोरेंट पॉवर’ 47 हजार कोटी गुंतवणार
गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चार करार पूर्ण
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
टोरेंट पॉवरने नूतनीकरणक्षम ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आणि वीज वितरणामध्ये 47,350 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी गुजरात सरकारसोबत चार करार केले आहेत. टोरेंट ग्रुपची कंपनी टोरेंट पॉवर लिमिटेडने व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या 10 व्या आवृत्तीचा भाग म्हणून गुजरात सरकारसोबत चार नॉन-बाइंडिंग मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग (एमओयू) वर स्वाक्षरी केली आहे. कंपनीने बुधवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनानुसार टोरेंट पॉवर आणि गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी यांच्यात गांधीनगरमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. टॉरेंट पॉवरचा आपल्या भविष्यातील गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा भाग अक्षय ऊर्जा निर्मिती, हायड्रोप्रकल्प, ग्रीन हायड्रोजन/ग्रीन अमोनिया उत्पादन आणि वीज वितरण या प्रमुख राष्ट्रीय प्राधान्यांमध्ये सहभागी होण्याचा मानस आहे, असे टोरंट समूहाचे अध्यक्ष समीर मेहता यांनी निवेदनात म्हटले आहे.