For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टोरेंट गॅसने आयपीओसाठी दाखल केला अर्ज

06:39 AM Mar 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
टोरेंट गॅसने आयपीओसाठी दाखल केला अर्ज
Advertisement

टोरेंट समूहातील तिसरी कंपनी ठरणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टोरेंट गॅस यांनी आयपीओसाठी आपला सविस्तर अर्ज नुकताच सेबीकडे दाखल केला आहे. टोरेंट समूहातील ही कंपनी असून शहरांतर्गत गॅस वितरण सेवा व्यवसाय ही कंपनी करते. सदरची कंपनी आपला आयपीओ आणणार असून त्या संदर्भातली अर्जासाठी आवश्यक रीतसर कागदपत्रे कंपनीने बाजारातील नियामक सेबी यांच्याकडे नुकतीच सादर केली आहेत. आयपीओ सादर करणारी ही टोरेंट समूहातील तिसरी कंपनी  आहे. याआधी टोरेंट फार्मास्युटिकल आणि टोरेंट पॉवर यांचे आयपीओ सादरीकरण करण्यात आले असून त्यांचे समभाग बाजारात सुचीबद्ध झाले आहेत. इश्यूसंदर्भात अॅक्सिस कॅपिटल, कोटक महिंद्रा कॅपिटल आणि सिटी या काम करत आहेत.

Advertisement

कंपनीची सेवा

कंपनी सात राज्यांमध्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशामध्ये म्हणजेच 34 जिह्यांमध्ये आपल्या गॅस वितरण व्यवसायाची सेवा पुरवत आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये 4,706 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला होता. याच दरम्यान याच आर्थिक वर्षात 45 हजार 638 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता.

Advertisement
Tags :

.