For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नव्या पिढीकडे सोपविली मशाल : बिडेन

07:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
नव्या पिढीकडे सोपविली मशाल   बिडेन
Advertisement

कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यावर अमेरिकेच्या अध्यक्षांनी जनतेला केले संबोधित : अध्यक्षीय उमेदवारीतून माघार

Advertisement

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन हे कोरोना संसर्गातून बरे होत 7 दिवसांनी देशासमोर आले. बिडेन यांनी डेमोक्रेटिक पार्टीची अध्यक्षीय उमेदवारी सोडल्याच्या पार्श्वभूमीवर ओव्हल ऑफिसमधून देशाला संबोधित केले आहे. मी नव्या पिढीला राजकीय मशाल सोपवू इच्छितो असे बिडेन यांनी म्हटले आहे. बिडेन यांचे ओव्हल ऑफिसमधून हे चौथे संबोधन होते. यावेळी त्यांच्या पत्नी जिल बिडेन, कन्या ऐशले बिडेन, पुत्र हंटर बिडेन समवेत नातवंडं उपस्थित होती. स्वत:च्या 11 मिनिटांच्या भाषणत बिडेन यांनी अमेरिकेच्या राजकारणात पाऊल ठेवण्यापासून शिखरापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाविषयी माहिती दिली. त्यांच्या भाषणादरम्यान पत्नीसमवेत पूर्ण परिवार भावुक झाला होता. तर कन्या ऐशलने बिडेन यांना बिलगून स्वत:च्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Advertisement

मतदानपूर्व सर्वेक्षणात माझ्या पराभवाची भीती व्यक्त करण्यात आली होती. याचमुळे मी या अध्यक्षीय पदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:सोबत डेमोक्रेटिक पार्टीच्या सहकाऱ्यांना पराभवाच्या दिशेने खेचू शकत नाही. नव्या पिढीला मशाल सोपविणे आमच्या राष्ट्राला एकजूट करण्याची सर्वोत्तम पद्धत असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. मी अध्यक्षपदाचा सन्मान करतो, परंतु मी स्वत:च्या देशावर अधिक प्रेम करतो. अमेरिकेच्या जनतेने एका खोडकर मुलाला पुढे जाण्याची संधी दिली. मी यासाठी सर्वांचा आभारी आहे. मी स्वत:च्या जीवनातील 11 वर्षे देशाच्या सेवेकरता दिली आहे. हे केवळ अमेरिकेतच घडू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांच्यावर निशाणा

अमेरिकेविषयी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथे कुठलाही राजा किंवा हुकुमशहाचे शासन नाही. येथील लोकांचे राज्य आहे. आता इतिहास लिहिणे लोकांच्या हातात आहे. अमेरिकेचे भविष्य येथील जनतेच्या हातात आहे. अमेरिकेला पुढे नेणे किंवा मागे ढकलणे, आशा आणि द्वेष, एकता आणि विभाजन यांच्यात निवड करावी लागणार आहे. आपण अद्याप प्रामाणिक, शालीनता, सन्मान, स्वातंत्र्य, न्याय आणि लोकशाहीत विश्वास ठेवतो की नाही याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागणार असल्याचे म्हणत बिडेन यांनी अप्रत्यक्षपणे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

सत्य हा देशाचा पवित्र उद्देश

आम्ही एक महान राष्ट्र आहोत, कारण आम्ही चांगले लोक आहोत. जेव्हा अमेरिकेच्या जनतेने अध्यक्षपदासाठी माझी निवड केली होती, तेव्हा मी सत्य बोलेन असे असा शब्द दिला होता. सत्य या देशाचा पवित्र उद्देश आहे. हे आमच्यापेक्षाही मोठे आहे. आम्हाला याच्या रक्षणासाठी एकजूट व्हावे लागणार असल्याचे वक्तव्य बिडेन यांनी केले आहे.

कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा

जो बिडेन यांनी यापूर्वी अध्यक्षीय पदाच्या उमेदवारीतून माघार घेतली आहे. तसेच त्यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे या उमेदवारीसाठी नाव सुचविले आहे. डेमोक्रेटिक पार्टीत आता कमला हॅरिस यांना पुरेसे पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे. तसेच त्यांनी अत्यंत कमी कालावधीत स्वत:च्या उमेदवारीच्या समर्थनार्थ पुरेशी देणगीही जमविली आहे. सप्टेंबर महिन्यात डेमोक्रेटिक पार्टीच्या संमेलनात कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.