For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टॉपसिडेड साबालेंका अंतिम फेरीत

06:36 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
टॉपसिडेड साबालेंका अंतिम फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन

Advertisement

डब्ल्यूटीए टूरवरील 2026 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू झालेल्या पहिल्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत बेलारुसच्या टॉपसिडेड आर्यना साबालेंकाने एकेरीची अंतिम फेरी गाठताना कॅरोलिना मुचोव्हाचा पराभव केला. आता या स्पर्धेत रविवारी साबालेंका आणि मार्टा कोस्ट्यूक यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.

या स्पर्धेत साबालेंकाने सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात साबालेंकाने कॅरोलिना मुचोव्हाचे आव्हान 6-3, 6-4 असे सरळ सेटमध्ये संपुष्टात आणले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मार्टा कोस्ट्यूकने चौथ्या मानांकीत जेसिका पेगुलाचा 6-0, 6-3 अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडला. या स्पर्धेत कोस्ट्यूकचा हा अव्वल सिडेड खेळाडूवरील सलग तिसरा विजय आहे. गेल्या वर्षी साबालेंकाने अमेरिकेच्या मॅडिसन किजचा अंतिम सामन्यात 6-3, 6-3 असा परभव करत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. 18 जानेवारीपासून 2026 च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला बेलबोर्नमध्ये प्रारंभ होत आहे.

Advertisement

ब्रिस्बेन स्पर्धेतील पुरूषांच्या विभागात रशियाचा टॉपसिडेड मेदव्हेदेव आणि अमेरिकेचा अॅलेक्स मिचेलसन तसेच अॅलेक्सझांडेर कोव्हासेव्हीक आणि ब्रेन्डॉन नाकासिमा यांच्यात उपांत्य फेरीचे सामने होतील.

Advertisement
Tags :

.