योग्यवेळी घेतला ब्रेक : आयशा जुल्का
चित्रपट सोडण्याचा नाही पश्चाताप
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आयशा जुल्का सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रीय आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याच्या पेशासोबत आणखी काही गुण असतात. मला चित्रकाम अन् नक्षीकाम पसंत होते. परंतु चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने मी याकरता वेळ देऊ शकत नव्हते. परंतु आता वेळ मिळत असल्याने हे छंद पूर्ण करत असल्याचे आयशाने सांगितले आहे.
माझी कारकीर्द बहरात असताना अनेक चित्रपट मी तारखा उपलब्ध नसल्याने करू शकले नाही. परंतु याचा मला पश्चाताप देखली नाही. मी त्या काळात योग्य निर्णय घेतले. त्यावेळी मला एकाच प्रकारच्या भूमिका मिळत होत्या. मनानुसार काम मिळत नसल्याने मी ब्रेक घेणे योग्य समजले असे आयशा यांनी म्हटले आहे. सद्यकाळात ओटीटी आणि मोठ्या पडद्यावर फारसे अंतर नाही. दोन्ही प्लॅटफॉर्मवर झोकून देत काम करावे लागते. हॅप्पी फॅमिली : कंडिशन्स अप्लाय या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचे चित्रिकरण एप्रिल-मे महिन्यात सुरू होणार आहे. तर धनबाद नाव असलेल्या सीरिजचे चित्रिकरण पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
मी आता पसंत पडणारेच काम करत आहे. मला आता काही सिद्ध करायचे नाही. याचमुळे चांगला प्रोजेक्ट समोर आला तरच त्याची निवड करत असल्याचे आयशाचे सांगणे आहे.