For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टोनी हेमिंग प्रमुख क्युरेटर

06:33 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
टोनी हेमिंग प्रमुख क्युरेटर
Advertisement

वृत्तसंस्था/लाहोर

Advertisement

ऑस्ट्रेलियाचे टोनी हेमिंग यांची पीसीबीने दोन वर्षांच्या कालावधीकरिता प्रमुख क्युरेटर म्हणून नियुक्ती केली आहे. पीसीबीच्या प्रवक्त्याने सोमवारी ही घोषणा केली. यापूर्वी पाक क्रिकेट मंडळ (पीसीबी) देशातील दर्जेदार खेळपट्ट्या बनविण्यासाठी विदेशी क्युरेटर्सबरोबर करार करत असतं. अॅन्डी अॅटकिन्सन यांनी पाकमधील खेळपट्ट्यांचा दर्जा सुधारण्यास खूप मदत केली आहे. हेमिंग यांना तब्बल क्युरेटर क्षेत्रातील 40 वर्षांचा अनुभव आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न, पर्थ आणि होबार्ट येथील खेळपट्ट्या आणि मैदाने तयार करण्यामध्ये हेमिंग यांचा वाटा महत्वाचा आहे. आगामी क्रिकेट हंगामामध्ये बांगलादेश, विंडीज आणि इंग्लंडचे संघ पाकचा दौरा करणार असल्याने या दौऱ्यासाठी दर्जेदार खेळपट्ट्या उपलब्ध करुन देण्याकरिता पीसीबीने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Advertisement

.