बेकायदेशीर वाळू उत्खनना विरोधात तोंडवळीवासियांचे खाडीपात्रात उपोषण
12:29 PM Jan 15, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
आचरा प्रतिनिधी
कालावल खाडीपात्रातील तोंडवळी गाव परिसरातील वाळू उपसा करण्यासाठी शासनाने निश्चित केलेले ठिकाण हे चुकीचे असून यामुळे ग्रामस्थांच्या जमिनींची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. वाळू उत्खनन रोखण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार विनंती अर्ज आणि पाठपुरावा करून देखील बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याने ग्रामस्थांच्या जमिनींची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. यामुळे ग्रामस्थांनी आज थेट खाडीपात्रात थेट होड्या घालून उपोषण सुरू केले आहे.
Advertisement
Advertisement