For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्या स्व. जिजाबाई सावंत यांचा स्मृतिदिन

04:25 PM May 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
उद्या स्व  जिजाबाई सावंत यांचा स्मृतिदिन
Advertisement

भालावल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
भालावल येथील स्व. जिजाबाई तुकाराम सावंत यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी ५ मे रोजी स्व. जिजाबाई सावंत स्मारक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.स्व. जिजाबाई सावंत या सेवाभावी व परोपकारी व्यक्तिमत्व म्हणून भालावाल परिसरात परिचित होत्या. पतीच्या अकाली निधनानंतर काबाडकष्ट करून त्यांनी मुलांचे पालन पोषण करताना त्यांना चांगले शिक्षण दिले. त्यांच्या स्मृती चिरंतर राहण्यासाठी सावंत कुटुंबीयांनी गावात स्व. जिजाबाई सावंत स्मारक साकारले असून या स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.यानिमित्त सकाळी पुजा, अभिषेक, गणपती पुजन, ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात होम हवन, तरपण विधी, दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी भजन, किर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. जिजाबाई सावंत यांचे सुपुत्र शिवा सावंत, भदू (आबा) सावंत, रमेश सावंत, डॉ सुभाष सावंत, मंगेश सावंत यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.