For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव

04:25 PM Nov 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
Advertisement

हरिनाम सप्ताह १५ नोव्हेंबर रोजी

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

देवसू गावचे ग्रामदैवत श्री देवी शेंडोबा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शेंडोबा माऊली देवसूसह केसरी आणि दाणोली या तीन गावांचे एकत्रित देवस्थान आहे.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर शेंडोबा माऊलीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात येणार आहे. या दिवशी तीन गावच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे.यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन या तीनही गावच्या मानकरी आणि देवसू ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement

१५ रोजी हरीनाम सप्ताह
यानिमित्त मंदिरात शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सात प्रहाराच्या हरीनाम सप्ताहाला विधिवत प्रारंभ होणार आहे. यानिमित्त मध्यरात्री कुळघराकडून सवाद्य वारकरी दिंडी निघणार आहे. या दिवशी देवसू परिसरातील भजनी मंडळे आपली सेवा शेंडोबा माऊली चरणी अर्पण करून अखंड जागर करणार आहेत. दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.

Advertisement
Tags :

.