शब्दगंध कवी मंडळाचा उद्या वर्धापनदिन
प्रतिनिधी/ बेळगाव
शब्दगंध कवी मंडळाचा 34 वा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. 18 रोजी सकाळी 10.30 वाजता सरस्वती वाचनालय शहापूर येथे होणार आहे. या निमित्त ‘आमचे जगणे आमची कविता’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये प्रा. प्रदीप पाटील, मनीषा पाटील व वसंत पाटील सहभागी होणार आहेत. अध्यक्ष म्हणून प्रा. अशोक अलगोंडी उपस्थित राहणार आहेत.
कवींचा परिचय पुढीलप्रमाणे-
प्रा. प्रदीप पाटील यांचे ‘आत्मसंवाद व अंतरीचा भेद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. दोन कादंबऱ्या व काही कथा प्रकाशित आहेत. तिसरा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांच्या कविता शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये लावण्यात आल्या आहेत. त्यांना कोमसापचा ‘मराठी कविता राजधानी पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार व अन्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मनीषा पाटील यांचे ‘पायवाटेवरील दिवे, ‘माती विश्व’, ‘नाती वांझ होताना’ हे काव्य संग्रह प्रकाशित आहेत. अनेक कवि संमेलनांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांना शैला सायनाकर पुरस्कार, वामनदादा कर्डक पुरस्कार, अक्षरगौरव साहित्य पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार, मसापचा लक्ष्मीबाई जोशी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
वसंत पाटील यांच्या ‘कविता धरणाआधी आणि नंतरच्या’ हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. अनेक संमेलनांमध्ये त्यांनी कवि संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांना पद्मश्री सुधांशू साहित्य पुरस्कार, पद्मश्री नारायण सुर्वे पुरस्कार, दादासाहेब उंडाळकर साहित्य पुरस्कार, चैतन्य माने साहित्य पुरस्कार, यशवंतराव युवा साहित्य पुरस्कार मिळाला आहे. काव्यरसिक व भाषाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.