मणेरी देवी माऊलीचा वर्धापन दिन उद्या
02:46 PM Jan 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
दोडामार्ग:
Advertisement
तालुक्यातील मणेरी येथील श्री देवी माऊलीचा नववा वर्धापन दिन माघ शुद्ध दशमी, बुधवार दि. २८ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त सकाळी 9 वा. माऊली देवीची व देव-देवतांचा अभिषेक व विधिवत पूजा होणार असून, 10 वा. सत्यनारायण महापूजा (यजमान – श्री किशोर नाईक दाम्पत्य) आरती व तीर्थप्रसाद. दुपारी 1 वा. सार्वजनिक स्वरूपात महाप्रसाद. सायंकाळी 5 वा. ग्रामस्थाचे सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम तर रात्री 8 वा. श्री सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ, दोडामार्ग यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली मंदिर पंचायतन समिती मणेरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement