उद्या अंगारक संकष्टी
12:27 PM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : वैशाख कृष्ण चतुर्थी मंगळवार दि. 5 रेजी असून अंगारक संकष्टीचा योग जुळून आला आहे. त्या निमित्ताने शहर आणि परिसरातील गणेश मंदिरांतून विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले. चंद्रोदय रात्री 10.19 वा. असून चंद्रोदयाला महाआरती व तीर्थप्रसाद वितरण होणार आहे. सध्या सुरू असलेल्या पराभवनाम संवत्सरातील पहिली अंगारक संकष्टी उद्याच्या मंगळवारी आहे, तर 2026 मधील ही दुसरी अंगारक संकष्टी आहे. यापूर्वी पौष मासात (6 जानेवारी 2026) अंगारक संकष्टी होती. चालू वर्षात 29 सप्टेंबर (भाद्रपद मास) आणखी एक अंगारकी योग आहे. 2026 सालात एकूण तीन अंगारकी संकष्टी आल्याचे म्हणता येईल.
Advertisement
Advertisement