कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara News : सततच्या पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत, प्लॉटमध्ये पाणीच पाणी

04:32 PM May 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Advertisement

मसूर : टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोकडे रेह गोल्ड म्हणून पाहत असतो. दोन महिन्यांपूर्वी टीमें टोच्या दराने नीचांक गाठल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. काठी शेतकरी टोमॅटो तोडून रस्त्यावर टाकत होते, तर काहींनी टोमॅटोचे तोडेच थांबवले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून दराचा आलेख बाजारपेठेत उंचावत होता.

Advertisement

त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत असतानाच गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे 'लाल सोन्याला दराची आशा, पावसाने केली बळीराजाची निराशा' अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

टोमॅटो पिकाकडे शेतकरी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून पाडत असतात. उत्पादन खर्च जास्त असल्याने आणि वराची शाश्वती नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली होती. जर दर चांगला लागला, तर हे पीक मालामाल करते. मात्र दर पडल्यावर उत्पादन खर्चही निघतनाही.

अनेक वर्षांचा अनुभव घेता जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दर वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. उन्हाळी हंगामात टोमॅटोच्या लागणीचे तोहे जूनपासून सुरू होतात. कराड तालुक्यात इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात जादा टोमें टोच्या लागणी करत असतात. गतवर्षी अनेकांना दहा किलोला साडेतीनशे ते पाचशे रुपये असा चांगला दर मिळाला होता.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात दहा किलोचा दर सहाशे रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत पोहोचला होता. सध्या मुंबई बाजारपेठेत टोमॅटोच्या प्रतवारीनुसार दर मिळत आहे. दहा किलोला साडेतीनशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

गेल्या पाच दिवसांपासून सतत पडत असलेलेल्या पावसाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी उघडिपीची वाट पाहत आहेत. उन्हाळ्यात मार्च, एप्रिल, महिन्यात टोमेंटोची लागवड केली जाते. त्याचे तोडे सध्या सुरू झाले आहेत तर काही शेतकऱ्यांचे तोडे जून महिन्याच्या मध्यावर तर काहींचे तोहे जुलैमध्ये सुरू होतील.

यंदाच्या हंगामात तपमानाचा सामना करत शेतकऱ्यांनी जावा उत्पादन खर्च करून जोमदार बागा आणल्या आहेत. सततच्या पावसामुळे करपा, काळा ठिपका, बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून प्लॉट उन्मळू लागले आहेत.

काही शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या झाडासाठी उभे केलेल्या काव्या वादळी वाऱ्याने वाकल्याने झाडे जमिनीला टेकले आहेत. त्यामुळे ऐन वराच्या तोंडावर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे प्लॉटमध्ये पाणी साठत्याने आलेला टोमॅ टो तोडणेही अशक्य झाले आहे.

तसेच नव्याने लागवड केलेल्या टोमॅटो प्लॉटमधील रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आणखीनच अडचणीत आला आहे. कराड तालुक्यातील पाडळी, हेळगाव, मसूर, कोणेगाव, कवठे, किवळ, कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे नव्हती, शिरवडे, पार्ले, वडोली निळेश्वर, बनवाडी आदी गावांत टोमॅटोचे उत्पादन शेतकरी घेतात.

दरवाढीच्या अपेक्षा वाढल्या...

गेल्या पाच दिवसांपासून पाऊस सुरू असला, तरी अजून तरी टोमॅटोच्या बागा चांगल्या आहेत. अपवादानेच काही शेतकऱ्यांच्या बागेत पाणी साचून राहत आहे. नाशिक, पुणे विभागात टोमॅ टीचे क्षेत्र मोठे असते. यंदाच्या हंगामात पावसामुळे तेथील टोमॅटोच्या बागा गेल्या आहेत. त्यामुळे येथील टोमॅटोचे वर वाढतील, असे जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे. सध्या मुंबई बाजारपेठेत दहा किलोचा दर तीनशेपासून चारशे रुपये भेटत आहे. यापुढेही दर असाच वाढत जाईल, अशी अपेक्षा शेतकन्यांना आहे.

पाऊस थांबला नाही तर...

"गेल्या चार दिवसांत सतत पडत होता. पाऊस थांबणे गरजेचे आहे, अन्यथा रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन घटू शकते व टोमॅटो उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुक्सान होऊ शकते."

- शेखर पाटील, शेतकरी, डेळगाव

 

Advertisement
Tags :
#karad#satara#satara _news#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediamasursatara crop damagetomato damage
Next Article