For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टॉम क्रूजचा ‘टॉप गन 3’ येतोय

06:53 AM May 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
टॉम क्रूजचा ‘टॉप गन 3’ येतोय
Advertisement

मिशन इम्पॉसिबल 8 नंतर हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूज आता मॅवरिक होत मोठ्या पडद्यावर धमाल करण्याच्या तयारीत आहे. स्वत:ची 40 वर्षे जुनी फ्रेंचाइजी टॉप गनच्या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा त्याने केली आहे.

Advertisement

टॉप गन 3 मधून टॉम क्रूज स्वत:चा आयकॉनिक रोल पीट मॅवरिक मिशेलच्या रुपात परतणार आहे. मोठ्या पडद्यावर पुन्हा हाय ऑक्टेन आकाशात अॅक्शन पाहता येईल.  टॉप गन 3 वर अधिकृत स्वरुपात काम सुरू झाले आहे. याच्या पटकथेवर काम सुरू आहे. टॉप गन 3 या चित्रपटाची निर्मिती जेरी ब्रुकहायमर करणार आहेत.

टॉप गन हा चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित झाला होता. टॉमच्या कारकीर्दीतील हा सर्वात मोठा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने 80 च्या दशकात 353.8 दशलक्ष डॉलर्सचा गल्ला जमविला होता. तर 2022मध्ये प्रदर्शित टॉप गन 2 ने तर कमाईप्रकरणी इतिहास रचला होता. या चित्रपटाने 12,250 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.