टॉम क्रूज आणि अॅना डे अरमासचा ब्रेकअप
हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूज मागील काही महिन्यांपासून 37 वर्षीय अभिनेत्री एना डे अरमासोबत स्वत:च्या लव्हलाइफमुळे चर्चेत होता. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिले गेले होते. परंतु आता 63 वर्षीय टॉम क्रूजचा चौथ्यांदा ब्रेकअप झाला आहे. एना डे अरमाससोबत 9 महिन्यांच्या डेटिंगनंतर त्याने स्वत:ची रिलेशनशिप संपुष्टात आणली आहे. एना डे अरमास आणि टॉम यांनी संयुक्तपणे हे नाते संपविण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील काळात ते मित्र म्हणून कायम राहणार आहेत, परंतु आता परस्परांना डेट करणार नाहीत.
काही महिन्यांपूर्वी दोघेही अंतराळात विवाह करण्याची योजना आखत असल्याची चर्चा होती. दोघांनाही अॅडव्हेंचर अत्यंत पसंत आहे. परंतु स्वत:च्या ब्रेकअपला दोघांनीही अत्यंत समंजसपणे हाताळले असून लवकरच एका चित्रपटात ते काम करणार आहेत. टॉम आणि एना डे अरमास हे आगामी सुपरनॅचरल थ्रिलर ‘डीपर’मध्ये काम करत असून त्याचे चित्रिकरण सध्या स्थगित करण्यात आले आहे. याचबरोबर ते आणखी एका प्रोजेक्टसाठी एकत्र येऊ शकतात. टॉमने एना डे अरमाससोबत रिलेशनशिप सुरू करण्यापूर्वी तीन विवाह केले आहेत. त्याचा पहिला विवाह मिमी रोगर्स, दुसरा विवाह निकोल किडमन आणि तिसरा विवाह केटी होम्ससोबत झाला होता.