टॉम क्रूज-एना डी आर्मस रिलेशनशिपमध्ये ?
टॉम क्रूज आणि एना डी आर्मस यांना लंडनमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. यामुळे दोघांच्या डेटिंगच्या चर्चेने जोर पकडला आहे. अलिकडेच दोघांनाही एकत्र पाहिल्याने ते रिलेशनशिपमध्ये असल्याचा कयास वर्तविला जात आहे. टॉम आणि एना हे एकाच हेलिकॉप्टरमधुन लंडन हेलिपोर्टवर दाखल झाले. 62 वर्षीय क्रूज आणि 36 वर्षीय डी आर्मस दोघेही कॅज्युअल आउटफिटमध्ये होते. लंडनमध्ये दोघांनाही पहिल्यांदाच स्पॉट करण्यात आलेले नाही. यापूर्वी ते एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसून आले होते.
यापूर्वी एनाने एका मुलाखतीत टॉम क्रूजच्या स्टंटचे कौतुक केले होते. अशाप्रकारचे स्टंट मी करू शकत नाही, परंतु याकरता लागणारी मेहनत आणि शरीराला होणारी वेदना मला माहित आहे. यात मजा येत असली तरीही ते जोखिमीची असते असे एनाने म्हटले होते. टॉम क्रूज हा यापूर्वी अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये राहिला आहे. यात केटी होम्स आणि निकोल किडमन यांचाही समावेश आहे. तर केटी होम्ससोबत झालेल्या विवाहापासून टॉमला एक मुलगी देखील आहे.