For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी! राज्य सरकारचा निर्णय प्रसिध्द

12:33 PM Sep 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी  राज्य सरकारचा निर्णय प्रसिध्द
Advertisement

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण़ार्या गणेशभक्तांना गुऊवार दि. 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई - बंगळुऊ राष्ट्रीय महामार्ग, मुंबई दृ गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

Advertisement

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण़ार्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध कऊन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दि.14 ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी ’गणेशोत्सव 2024, कोकण दर्शन‘ अशा आशयाचे स्टीकर्स स्वऊपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध कऊन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.

Advertisement

तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाण़ार्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ही टोल माफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

Advertisement

.