टोकियोवासियांना होणार छत्रपती शिवरायांचे दर्शन
कोल्हापूर :
गनिमी काव्याने परकीय शत्रूला सळो की पळो करत मराठा साम्राज्याचा पाया रचणारे महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आता जपानमधील टोकियोविसायांना रोज दर्शन घडणार आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पाठपुराव्यानंतर जपान सरकारने दिलेल्या परवागनीनुसार पुण्यातील आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने टोकियामध्ये पुतळा विराजमान केला जात आहे. त्यासाठी 10 हजार स्केअर फुट जागाही देण्यात आली आहे. या जागेत पुतळा विराजमान कऊन त्याचे 8 मार्चला अनावरण करण्यात येणार आहे. अनावरण सोहळा भव्य-दिव्य स्वऊपात आयोजित करण्यात येणार आहे.
महाराजांच्या या पुतळ्याचे भारतवासियांना दर्शन घडावे यासाठी आम्ही पुणेकर संस्थेने गेल्या बुधवारपासून शिवस्वराज यात्रा साताऱ्यामधून सुऊ केली आहे. ही यात्रा छत्रपती टोकियोमध्ये विराजमान केल्या जाणाऱ्या अश्वाऊढ शिवाजी महाराजांचा पुतळ्यासह गुऊवारी सायंकाळी साताऱ्याहून कोल्हापूरात आली होती. दसरा चौकात छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देत शिवप्रेमींनी व नवीन राजवाडा येथे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी पुतळ्याचे स्वागत केले.
दरम्यान, आम्ही पुणेकर संस्थेने 8 नोव्हेंबर 2023 साली कुपवाडा या भारत-पाकिस्तान सीमेवरील 41-आर. आर. मराठा रेजिमेंटच्या आर्मी बेसकॅम्पमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान केला आहे. दरम्यानच्या काळात जपानमधील माजी आमदार व एदोगोवा इंडिया कल्चर सेंटरचे अध्यक्ष योगेंद्र पुराणिक यांनी टोकियोमध्येही शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्याची मागणी आम्ही पुणेकर संस्थेकडे केली होती. त्यानुसार गेल्या वर्षभरात संस्थेने भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे जपानमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी पाठपुरावा सुऊ केला होता. मंत्रालयानेही मनावर घेऊन टोकियोमध्ये पुतळा बसवण्यासाठी जपान सरकारकडे पाठपुरावा केला होता. जपान सरकारने सकारात्मकता दाखवत टोकियोमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी मान्यता दिली. 10 हजार स्केअर फुट जागाही दिली आहे.
दरम्यानच्या काळात आम्ही पुणेकर संस्थेने पुण्यातील ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांच्याकडून अश्वाऊढ छत्रपती महाराजांचा पुतळा बनवून घेतला. त्याची 8 फुट उंची आहे. हा पुतळा गुऊवारी साताऱ्याहून शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरात आणण्यात आला. दसरा चौकात पुतळा आल्यानंतर अनेक शिवप्रेमींनी स्वागत केले. यानंतर पुतळा नवीन राजवाड्याकडे नेण्यात आला. शुक्रवारी सकाळी 8 हा पुतळा कसबा तारळे (ता. राधानगरी) या गावी नेला जाणार आहे. तेथील लोकांना दर्शन घेतल्यानंतर पुतळ्याला मालवणकडे नेण्यात येईल.
- टोकियोमध्ये विराजमान केला जाणारा शिवाजी महाराजांचा पुतळा शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून देशाच्या 12 राज्यात नेण्यात येणार आहे. सलग 28 दिवस यात्रा सुऊ राहणार आहे. त्यासाठी यात्रा 8 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. यात्रेचे संपूर्ण नियोजन आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुणेकर संस्थेचे मार्गदर्शक उत्तम मांडरे, नितीन लचके, मंगेश मांडरे व अमर भूतकर यांनी केले आहे, असे संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी सांगितले.