For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज ‘मंगळवारी रात्री 8 वाजता’ हल्लाबोल!

06:56 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
आज ‘मंगळवारी रात्री 8 वाजता’ हल्लाबोल
Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला तंबी : सोशल मीडियावर संदेश जारी : एका रात्रीत देश उद्ध्वस्त करण्याचा निर्वाणीचा इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

इराण आणि अमेरिका यांच्यातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, हे राजनैतिक युद्ध आता सोशल मीडियावरही पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक गूढ संदेश आणि त्याला इराणी दूतावासाने दिलेल्या तीव्र प्रतिसादाने ऑनलाइन खळबळ उडाली आहे. युद्धाच्या या तणावपूर्ण वातावरणात, या ‘ट्विट युद्धा’कडे एक मोठा मानसिक दबाव म्हणून पाहिले जात आहे.

Advertisement

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक छोटा पण अत्यंत भडकाऊ संदेश पोस्ट केला. ‘मंगळवार, रात्री 8:00 वाजता ईस्टर्न टाइम!’ या ट्विटमधून ट्रम्प यांनी निर्वाणीचा इशारा देताना ते मोठ्या लष्करी हल्ल्याचे संकेत दिले. युद्धाची सध्याची परिस्थिती पाहता, संरक्षण तज्ञ आणि जगभरातील जनता याकडे संभाव्य हल्ल्याच्या वेळेचा इशारा म्हणून पाहत आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री महत्त्वपूर्ण निवेदनही केले. आपल्या निवेदनात अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिकेकडे एका रात्रीत संपूर्ण देश नष्ट करण्याची शक्ती आहे आणि ती रात्र कधीही येऊ शकते, अगदी दुसऱ्या रात्रीसुद्धा.’ या मोहिमेला ऐतिहासिक संबोधताना ही मोहीम लष्करी इतिहासात नोंदवली जाईल आणि यात सहभागी असलेला प्रत्येकजण महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.