For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांबरा महालक्ष्मीदेवी यात्रेची आज सांगता

10:38 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांबरा महालक्ष्मीदेवी यात्रेची आज सांगता
Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

येथे मंगळवार दि. 14 मे पासून श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू आहे. मंगळवारी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

ओटी भरणे कार्यक्रम

Advertisement

सोमवारी व मंगळवारी गावातील प्रत्येक गल्ली व भक्तांमार्फत वाजत गाजत येऊन देवीची ओटी भरण्यात येत होती. लक्ष्मीदेवीला सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करण्यात येत होते. पारंपरिक वाद्ये, बँड पथक, डॉल्बी व इतर वाद्यांच्या गजरात ओटी भरण्यासाठी भाविक सामूहिकरीत्या येत होते. त्यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भंडाऱ्याची उधळण करत व श्री लक्ष्मीदेवीचा जयजयकार करत भाविक श्री महालक्ष्मी देवीच्या गदगेच्या ठिकाणी दाखल होत होते. सर्व भक्तांचे श्री महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीच्यावतीने स्वागत करण्यात येत होते. मंगळवारी यात्रेचा आठवा दिवस असल्याने दिवसभर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पंचक्रोशीतील तसेच परगावच्या भाविकांचीही मोठी गर्दी झाली होती.

मान्यवरांची यात्रेला भेट

दरम्यान, यात्राकाळात पालकमंत्री सतीश जारकीहोळी, विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मातोश्री गिरीजा हट्टीहोळी व कुटुंबीय, माजी आमदार संजय पाटील, भाजपचे नेते किरण जाधव, विनय कदम, अनिल पोतदार, समितीचे नेते आर. एम. चौगुले यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी भेट देऊन श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.

पाळणे खेळण्यासाठी गर्दी

विमानतळ रस्त्याशेजारी विविध पाळणे, मनोरंजनाचे खेळ तसेच विविध स्टॉल्स थाटण्यात आले आहेत. या ठिकाणी खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे यात्राकाळात लाखो ऊपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.

देवीचे आज सीमेकडे प्रस्थान  

बुधवार दि. 22 रोजी दुपारी 2 पर्यंत देवीचे दर्शन व ओटी भरण्यासाठी भाविकांना मुभा असणार आहे. दुपारी 2 ते 4 पर्यंत विविध धार्मिक विधी होतील. 4 नंतर महालक्ष्मी देवी मंडपातून उठणार असून देवीचा व्हन्नाट (खेळ) होणार आहे. त्यानंतर देवीचे सीमेकडे प्रस्थान होऊन यात्रेची सांगता होणार आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीच्यावतीने अध्यक्ष राजू देसाई यांनी कळविले आहे.

Advertisement
Tags :

.