For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज कारिवडे सिद्धयोगी महापुरुष भंडारा उत्सव

04:17 PM Feb 01, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आज कारिवडे सिद्धयोगी महापुरुष भंडारा उत्सव
Advertisement

सिद्ध महापुरुष आणि कालिका मातेच्या भेटीचा अनुपम सोहळा

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी
कारिवडे गोसावीवाडी येथील सिद्धयोगी महापुरुष मठाचा भंडारा उत्सव रविवारी १ फेब्रुवारीला होत आहे. कोकणात गोसावी नाथपंथी सिद्धमहापुरूष मठापैकी हा मठ असून या भंडारा उत्सवासाठी जिल्ह्यासह बेळगाव, कोल्हापूर भागातून हजारो भाविक उपस्थित असतात.सिद्धयोगी महापुरुषाचा हा प्राचीन मठ असून येथे नाथपंथी समाजाची संस्कृती आणि परंपरा जोपासली जाते. त्यामुळे अध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात नवनाथांनी केलेल्या समाजजागृतीचीआणि संप्रदायिक भावनेची येथे प्रचिती येते. हा नाथपंथीय मठ डोंगराच्या निसर्गरम्य परिसरात असून हे एक जागृत देवस्थानही मानले जाते. तसेच राजसत्ता व पूर्वमागाला जोडलेल्या या देवस्थानचा भंडारा उत्सव नाथपंथी परंपरेनुसार सुरू आहे.या उत्सवानिमित्त मठात रविवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून नाथसंप्रदयाच्या विधीनुसार पूजा मांड घालून मंत्र म्हणून घट स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर सिद्ध महापुरुषाच्या बोलणे व फेडणे यासाठी भाविकाची रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते. रात्री १०.३० च्या सुमारास ग्रामदैवत कालिका मंदिरातून देवीच्या उत्सव मूर्तीसह तरंग सवाद्य महापुरुषाच्या समाधीकडे रवाना होणार आहे. शेकडो भाविकांच्या या सवाद्य पालखी मिरवणुकीचे सिद्धमहापुरुष मंदिराकडे आगमन झाल्यानंतर प्रथम महिला औक्षण करतात. त्यानंतर सिद्ध महापुरुष आणि कालिका मातेच्या अविस्मरणीय भेटीचा याची देही याची डोळा क्षण पाहून हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. मध्यरात्री १२ वाजता उत्सव गाऱ्हाणे भंडारा आहे. त्यानंतर या महत्वपूर्ण प्रसाद अर्थात रखवालीसाठी घालण्यात येते. त्यानंतर दशावतारी नाटक होणार सांदणीचे कारिवडे तसेच ओटवणे देवस्थानच्या मानकऱ्यांसह सावंतवाडी येथील सावंत भोसले राजघराण्याला देण्यात येतो.सोमवारी सायंकाळी या मठातील कालिकादेवीच्या उत्सवमूर्तीसह तरंग व पालखीचे कालिका मंदिरात प्रस्तान झाल्यानंतर या भंडारा उत्सवाची सांगता नाथ संप्रदयातील विविध परंपरांचे पालन करून होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.