Kolhapur : मार्गशीर्ष महिन्यातील आज पहिला गुरुवार!
लक्ष्मी-विष्णू पूजेसाठी शुभ दिवस
कोल्हापूर : आज, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. या दिवशी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. विवाहित महिला या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात.
कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना येतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, मार्गशीर्ष हा नववा महिना आहे. हिंदू धर्मात १२ महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहेत. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्व आहे. या महिन्यातील आज (दि २७) पहिला गुरुवार आहे.
येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी पूजा भक्तीभावाने केली जाते. हा दिवस देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजेसाठी अत्यंत शुभमानला जातो. या व्रतामुळे घरात धन-धान्याची भरभराट आणि शांती लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक महिला या दिवशी देवीची पूजा करतात. चौरंगावर देवीची स्थापना करून पूजा-अर्चा आणि महालक्ष्मीच्या व्रताची कथा ऐकली जाते.
यंदा मार्गशीर्ष महिना २७ डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे. या महिन्यात ४ मार्गशीर्ष गुरूवार साजरे केले जाणार आहेत.