For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

`भारत - न्यूझीलंड मालिकेतील आज निर्णायक सामना

06:58 AM Jan 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
 भारत   न्यूझीलंड मालिकेतील आज निर्णायक सामना
Advertisement

वृत्तसंस्था/ इंदूर

Advertisement

तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत असताना आज रविवारी इंदूरच्या भरपूर धावसंख्या उभ्या राहणाऱ्या होळकर स्टेडियमवरील निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सामना एका दृढनिश्चयी न्यूझीलंडशी होईल तेव्हा मायदेशातील भारताच्या निर्विवाद वर्चत्वाची कसोटी लागेल. मार्च 2019, पासून भारताने मायदेशात कोणतीही द्विपक्षीय एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 0-2 अशी पिछाडी भरून काढून दिल्लीतील निर्णायक सामन्यासह मालिका 3-2 अशी जिंकली होती. पण हाइतिहास आता धोक्यात आला आहे.

न्यूझीलंडसाठीही परिस्थिती तितकीच महत्त्वाची आहे. ब्लॅक कॅप्स संघ 1989 पासून द्विपक्षीय एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा दौरा करत आहे, परंतु त्यांनी भारतात कधीही मालिका जिंकलेली नाही आणि ही मालिका जिंकण्याची त्यांची सर्वोत्तम संधी आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना अनेक नकोसे विक्रम झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात मायदेशात आणखी एक पराभव पत्करावासा वाटणार नाही. गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात पाच कसोटी सामने गमावले आहेत तसेच श्रीलंकेत प्रथमच एकदिवसीय मालिकाही गमावली आहे.

Advertisement

राजकोटमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील भारताचा पराभव हा एखाद्या अपवादात्मक खेळीमुळे कमी आणि न्यूझीलंडने मधल्या षटकांमध्ये सामन्यावर नियंत्रण मिळविल्याने अधिक झाला. डॅरिल मिशेलचे नाबाद शतक हे विचारपूर्वक केलेल्या आक्रमणावर, विशेषत: फिरकी गोलंदाजीविऊद्धच्या हल्ल्यावर उभारले गेले आणि हाच तो विभाग आहे जिथे भारत अलीकडे संघर्ष करत आहे. इंदूरचे मैदान, त्याच्या लहान सीमा आणि गोलंदाजांना मिळणारी कमी मदत हे पाहता येथे चुकांना आणखी कमी वाव आहे.

फिरकी गोलंदाजीला सामोरे जाण्याच्या भारताच्या क्षमतेवरही प्रश्न निर्माण झाला आहे. संघात खोली आणि ताकद असूनही मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजीविऊद्ध खेळाडूंना अस्वस्थता जाणवत आहे. महत्त्वाच्या टप्प्यांवर स्ट्राइक फिरविणे थांबत आहे, ज्यामुळे फलंदाजांना नियमितपणे धावा करण्याऐवजी धोकादायक पर्याय निवडणे भाग पडत आहे. ज्या मैदानावर धावसंख्या 350 च्या पुढे सहज जाऊ शकते तिथे ही शांत षटके सामन्याची गती निर्णायकपणे बदलू शकतात.

सर्वांचे लक्ष रोहित शर्मावर असेल, जो या मालिकेत खराब फॉर्ममधून जात आहे. डावाच्या सुऊवातीला त्याचा अतिआक्रमक दृष्टिकोन हे भारताच्या अलीकडील एकदिवसीय धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्या आहे, परंतु वारंवार लवकर बाद झाल्यामुळे त्याच्यावर थोडा दबाव वाढला आहे. दरम्यान, विराट कोहली हाच भारताच्या एकदिवसीय फलंदाजीचा केंद्रबिंदू आहे. या वरिष्ठ खेळाडूंसाठी भारताचा पुढील 50 षटकांचा सामना कदाचित जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावरील असेल. त्यामुळे चाहते रो-को जोडीकडून आणखी एका शानदार प्रदर्शनाची अपेक्षा करतील.

नितीशकुमार रे•ाr आणि आयुष बदोनी यांच्यातील कुणाची निवड करायची हाही एक मोठा वादाचा प्रश्न आहे. रे•ाrचा गोलंदाजीत फारसा वापर केला जात नसला, तरी तो वेगवान गोलंदाजीचा एक अतिरिक्त पर्याय देतो आणि डावाच्या शेवटच्या टप्प्यात फटकेबाजीची त्याच्याकडे क्षमता आहे. तर बदोनीकडे फिरकीविऊद्ध अधिक पक्का खेळ करण्याची आणि मधल्या षटकांमध्ये संयम राखण्याची क्षमता आहे.

इंदूरमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संघात घेण्याच्या बाजूनेही युक्तिवाद अधिक मजबूत झाला आहे. कारण येथे केवळ वेगापेक्षा गोलंदाजीतील विविधतेमुळेच यश मिळते. नवीन चेंडू स्विंग करण्याची, स्टंपवर मारा करण्याची आणि अखेरच्या षटकांमध्ये यॉर्कर टाकण्याची अर्शदीपची क्षमता भारताला एक वेगळा डावपेचात्मक पैलू देते. त्याच्या समावेशामुळे मधल्या आणि शेवटच्या टप्प्यात फिरकी गोलंदाजांवरील भारही कमी होईल. आव्हानात्मक बाब ही आहे की, तो कोणाच्या जागी खेळणार. मोहम्मद सिराजची नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याची भूमिका पाहता त्याला संघातून वगळणे कठीण आहे. परिस्थिती आणि फलंदाजीतील खोली पाहता सर्वांत संभाव्य बदल म्हणजे एखाद्या फिरकी गोलंदाजाच्या किंवा वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूच्या जागी त्याला संधी देणे.

के. एल. राहुलची भूमिका हे एक असे क्षेत्र आहे जिथे आधीच स्पष्टता आहे. पाचव्या क्रमांकावरील त्याची कामगिरी हे अधोरेखित करते की, त्याला त्याच स्थानावर ठेवणे किती महत्त्वाचे आहे. त्याऐवजी त्याला सहाव्या क्रमांकावर खाली ढकलल्यास तिथे त्याची लय सांभाळण्याची आणि दबावाखाली डाव सावरण्याची क्षमता कमी होते. न्यूझीलंड संघात प्रचंड आत्मविश्वास आणि स्पष्टता आहे. मिचेलच्या वर्चस्वाला डेव्हॉन कॉनवेचा पाठिंबा मिळालेला असून ब्लॅक कॅप्सनी योग्य खेळाडू निवडण्याची आणि योजनांची नीट अंमलबजावणी करण्याची क्षमता दर्शविली आहे. त्यांच्या गोलंदाजी विभागात मोठी नावे नसली, तरी त्यांनी नैसर्गिक मदत नसलेल्या परिस्थितीतही विविधतेचा आणि अचूक टप्प्याचा प्रभावीपणे वापर केला आहे.

संघ : भारत-शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल. राहुल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, नितीशकुमार रे•ाr, आयुष बदोनी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.

न्यूझीलंड : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, मिचेल हे, निक केली, हेन्री निकोल्स, विल यंग, जॉश क्लार्कसन, झॅक फॉल्क्स, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, आदित्य अशोक, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, जेडन लेनोक्स, मायकेल रे.

सामन्याची वेळ : दुपारी 1:30 वा.

Advertisement
Tags :

.