महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sanjay Leela Bhansali Photo Story : बॉलीवूडला स्त्रीशक्तीची पात्रे देणाऱ्या संजय लिला भन्साळी यांचा आज वाढदिवस

06:06 PM Feb 24, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

ऐतिहासिक चित्रपटांमध्ये हातखंडा असणाऱ्या, आपल्य़ा भव्य आणि दिव्य सेटसाठी प्रसिध्द असणाऱ्य़ा; आपल्या प्रत्येक चित्रपटातील प्रत्येक पात्राचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या आणि कर्णमधूर संगीतासह एक मजबूत कथानकावर विश्वास ठेवून प्रेक्षकांचे मजोरंजन करणाऱ्या बॉलीवूडचा दुसरा ग्रेट शोमन संजय लीला बन्साली (Sanjay Leela Bhansali) यांचा आज वाढदिवस.

Advertisement

बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक संजय लीला भन्साळी यांनी बॉलीवूडला अनेक उल्लेखनीय चित्रपट दिले आहेत. भारतभरात त्यांच्या चित्रपटाचे लाखो- करोडो चाहते असून त्यांचा चित्रपट एक वेगळा अनुभव देते.

Advertisement

SLB नावाने आपल्या मित्रपरिवारामध्ये प्रसिध्द असलेल्या भन्साळी यांनी आपल्या चित्रपटामध्ये अनेक अविस्मरणीय पात्रे दिली. पण स्त्रीची पात्रे रंगवण्यात त्यांचा विशेष ङातखंडा आहे. त्यांनी रंगवलेल्या अनेक उल्लेखनिय पात्रांमुळे बॉलीवूड मधील नायिकांना एक वेगळी ओळख मिळाली. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातील मुख्य किंवा आघाडीच्या स्त्रिया आत्मविश्वास असणारी, खंबीर आणि स्वतंत्र आहेत. देवदासमधील पारो- चंद्रमुखीपासून बाजीराव मस्तानीमधील मस्तानी आणि गंगूबाईपर्यंत सर्वच पात्रांनी एक वेगळा ठसा उमटवलाय. ती पात्रे कोणती ती पाहूया.

संजय लीला भन्साळी यांनी करीअरच्या सुरवातीच्या काऴात बनवलेला 'हम दिल दे चुके सनम' ( Hum Dil De Chuke Sanam ) च्या हा त्यावर्षीचा सगळ्यात हिट चित्रपट ठरला. त्यातील ऐश्वर्या रायने (Aishwarya Ray) साकारलेली नंदिनी हे स्त्री पात्र बॉलीवूडमध्ये क्वचितच साकारली गेली. दुसऱ्याच्या अपेक्षांवर आधारित निवड करण्याऐवजी तीने स्वताच्या जीवनाचा अनुभव घेवून नवीन झेप घेतली. समीरवर तिचे स्पष्ट प्रेम असूनही, तीने स्वतःवर विश्वास ठेवून ती वनराजची निवड केली.

पारो आणि चंद्रमुखी अश्या दोन पात्रांची जुगलबंदी असलेल्या देवदास (Devdas) या चित्रपटानेही इतिहास रचला. शाहरूख खानची (Shahrukh Khan) मुख्य भमिका असलेल्या चित्रपटात देवदास या प्रमुख पात्राबरोबर पारो आणि चंद्रमुखीने कथानकाला परिपुर्ण अर्थ दिला.

रामलीलामध्ये (Ramleela) लीला सनेराची भूमिका केलेल्या दीपिका पदुकोणचे करिअर वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. शेक्सपीयरच्या रोमियो आणि ज्युलिएटपासून प्रेरित असलेल्या भन्साळीच्या या कलाकृतीमध्ये आत्मविश्वासू लीलाने खंबीरपणाने आपल्या कुटुंबाचा व्यवसाय कशा पद्धतीने चालवून पुरषांशी बरोबरी केली याचे उदाहरण घडवून दिले आहे.

एतिहासिक चित्रपटांमध्ये विशेष हातखंडा असणाऱ्या संजय लीला भन्साळी यांनी पेशवा बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेवरून आधारीत बाजीराव- मस्तानी (Bajirao- Mastani) हा चित्रपट बनवला. या चित्रपटात दोन स्त्रिपात्रे रंगवली गेली असून बाजीरावची पत्नी काशीबाई ही एक अशी स्त्री आहे जिचा स्वाभिमान तिच्या पतीच्या अमर्याद प्रेमाच्या पलीकडे नाही. तर दुसरीकडे, मस्तानी केवळ प्रेयसी नव्हती, तर ती एक सेनानी होती. जी बाजीराव बरोबर लढून तिच्या वडीलांचे आणि त्यांचे राज्य वाचवते. तसेच शेवटी आपल्या प्रेमासाठी आणि जगाने आपल्याला बाजीरावाची पत्नी म्हणून ओळखावे यासाठी जगाशी संघर्ष करते.

पद्मावत ( Padmavat ) हा अजून एक संजय लीला भन्साळीच्या कलाकृतीचा लाजवाब नमुना म्हणता येईल. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी मोठ्या वादात सापडला होता. राणी पद्मावतीने स्वताच्या स्वाभिमानासाठी कोणतीही तडजोड केली नाही. आपला स्वाभिमान जपण्यासाठी तीने आपल्या प्राणाचे बलिदान दिले. राणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिकाचे वेगळे रुप प्रेक्षकांना भावले.

गंगूबाई काठीयावाडी (Gangubai Kathiyawadi) या रेट्रो पात्रामध्ये दिसलेल्या आलिया भटने याभुमिकेवर अनेक पारितोषिक जिंकले. साधी आणि सरळमार्गी असणारी गंगूबाई अपघाताने वेश्याव्यवसायात अडकते. पण तिथे ती एवढ्यावरच न थांबता तीथे आपले साम्राज्य उभे करून स्थानिक महिलांच्या हक्कासाठी लढते. समाजाने बहिष्कृत केलेल्या महिलांसाठी लढून ती त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करते.

Advertisement
Tags :
birthday ofBollywoodcharactersfemaleSanjay Leela BhansaliTbdnews
Next Article